रात्री 8 ला भेटायला बोलावलं, थेट उसाच्या शेतात नेलं…शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं, सांगलीत खळबळ !
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे एका शाळकरी मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आ

राज्यात महिला, लेकी-बाळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अगदी बिकट होत चालला आहे. रोज कुठे ना कुठे छेडछाडच्या, अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येतं आणि मन अगदी सुन्न होतं. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका चिमुकल्या मुलीवर अत्याचर करून तिची हत्या करण्यात आली, त्यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण उसळलं. ही घटना ताजी असतानाच आता सांगलीतही असाच काहीस प्रकार घडला आहे. सांगलीच्या ईश्वरपूर येथे एका शाळकरी मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केला. त्यांचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही, तर नंतर ते दोन्ही आरोपी त्या मुलीचे कपडे घेऊन फरार झाले. ती मुलगी रस्त्यावरून विवस्त्रावस्थेत जात असताना गावकऱ्यांपैकी काहींनी पाहिलं, त्यांना धक्काच बसला. अखेर कोणीतरी तिला मदत करत कपडे आणून दिले.
या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं असून याप्रकरणी ईश्वपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यातील एक हा सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले आहे. ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोन करून नाक्यावर बोलावलं आणि..
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8 व्या इयत्तेत शिकते. ती तिच्या आईसह ईश्वरपूरमध्ये राहते. घटनेच्या दिवशी, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋतीक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. ती तिथे गेली असता ऋतीक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. पीडित मुलीने त्याना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तिला न जुानता अत्याचार केला, तसेच तिला बेदम मारहाणही केली.
विवस्त्रावस्थेत रस्त्यावर दिसली अन्..
एवढंच नव्हे तर नंतर त्यांनी क्रूरतेची सीमा गाठत त्या पीडित मुलीचे कपडे घेतले आणि तिला विवस्त्रावस्थेत तसाच सोडून आरोपींनी तिथून पळ काढला. घडलेल्या घटनेचा पीडितेला मोठा धक्का बसला, मात्र ती कशीबशी उठली आणि घराच्या दिशेने चालू लागली.पीडित मुलगी ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना रस्त्यावरील काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले.
या घटनेबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना माहिती दिल्यावर पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. तिला धीर देत, विचारपूस करत तिची चौकशी केली असता पीडितेन हिंमत गोळा करत घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला. तेव्हाच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर ईश्वरपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आणि सूत्र हलवत दोन्ही नराधम आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी ऋतीक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर आली आहे.
