AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकाने BMW मागितली, बापाने दिली स्विफ्ट डिझायर; संतापलेल्या तरुणाने आयुष्य संपवलं

एका तरुणाने आलिशान कारच्या हट्टीपणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा तरुण पालकांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची मागणी करत होता. पण त्याच्या पालकांनी स्विफ्ट डिझायर कार खरेदी केल्याने तरुणाने आयुष्य संपवले.

लेकाने BMW मागितली, बापाने दिली स्विफ्ट डिझायर; संतापलेल्या तरुणाने आयुष्य संपवलं
youth Suicide
| Updated on: Jun 05, 2025 | 8:11 PM
Share

सध्याच्या काळात तरुणांची जीवनशैली बदललेली आहे. तरुणांमध्ये आलिशान गाड्यांची क्रेझ आहे. अशातच आता तेलंगणातील सिद्दीपेट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आलिशान कारच्या हट्टीपणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या तरुणाला आलिशान कार हवी होती, मात्र त्याचे पालक ही हौस पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे नारज झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

चटलापल्ली गावातील घटना

सिद्दीपेटच्या चटलापल्ली नावाच्या गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथील २१ वर्षीय तरुण जॉनी त्याच्या पालकांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची मागणी करत होता. पण त्याच्या पालकांकडे इतके पैसे नव्हते. म्हणून त्यांनी स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली, त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बीएमडब्ल्यू कारचा हट्ट

समोर आलेल्या माहितीनुसार, चटलापल्ली गावातील जॉनी त्याच्या वडिलांकडे बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्याची मागणी करत होता. तसेच पालकांनी नकार दिल्यानंतर तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी भांडत असे आणि जर त्यांनी त्याला कार खरेदी केली नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीही तो देत ​​असे. जॉनीच्या पालकांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि ते बीएमडब्ल्यू कार खरेदी करू शकत नाहीत. पण जॉनी बीएमडब्ल्यू कार खरेदी करण्यावर ठाम होता. तसेच बीएमडब्ल्यू कार न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत होता. त्यानतर वडीलांनी कर्ज काढून त्याला मारुती स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली.

जॉनीने शेतात विष प्राशन करत आयुष्य संपवले

जॉनीला बीएमडब्ल्यू कार हवी होती. मात्र पालकांनी स्विफ्ट डिझायर कार खरेदी केल्यामुळे तो संतापला, त्याने आपल्या शेतात जात विष प्राशन केले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात नेले. तेथून त्याला चांगल्या उपचारांसाठी सिद्दीपेटमधील (आरव्हीएम) इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र शनिवारी रात्री जॉनीची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चटलापल्ली गावावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.