काही तरी मोठं कांड झालंय, काही तरी गडबड आहे… एकाच घरात तीन डेडबॉड्या सापडल्या; चौथी व्यक्ती गायब; सर्वच घामाघूम
दिल्लीत तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे अनेकांना घाम फुटला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राजधानी दिल्लीतील मैदान गढी भागातील खरक गावात धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे अनेकांना घाम फुटला आहे. या घटनेमागे मोठ्या घातापाताची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले असून चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आज (बुधवारी) खरक गावात पोलिसांच्या अनेक गाड्या सायरन वाजत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी एका घराबाहेर गर्दी जमली होती. काही तरी मोठं कांड झालंय, काही तरी गडबड आहे अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला, त्यावेळी त्यांना सर्वात आधी रक्ताने माखलेल्या एका पुरूषाचा मृतदेह दिसला. तिथून थोड्याच अंतरावर एका महिलेचा मृतदेह पडलेला होता, तिचे तोंड कापडाने बांधलेले होते. त्यानंतर अजून एक मृतदेह आढळल्याने अनेकांना घाम फुटला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रेम सिंग, त्यांची पत्नी रजनी आणि मुलगा ऋतिक यांचा समावेश आहे. या तिघांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. हे कुटुंब खूप शांत होते, कधीही भांडण झाले नाही, त्यामुळे अचानक असं कसं काय घडलं? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला.
कुटुंबातील चौथा सदस्य गायब
या घरात सिद्धार्थ हाही राहत होता. मात्र तो घटनास्थळी हजर नव्हता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. सिद्धार्थबाबत शेजाऱ्यांकडे चौकशी केली, सिद्धार्थवर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. तसेच सिद्धार्थने काही लोकांना फोनवर सांगितले होते की, ‘मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे, आता मी या घरात राहणार नाही.’ त्यामुळे त्यानेच तिहेरी हत्या केल्याचा संशय आहे. मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक टीमने घरातून रक्ताचे नमुने, बोटांचे ठसे आणि मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती गोळा केली आहे.
संपूर्ण गावात भीतीचे वातावरण
या तिहेरी हत्याकांडांमुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिद्धार्थने स्वतःच्या आईवडिलांना आणि भावाला मारल्याची चर्चा रंगली आहे. सिद्धार्थ इतके भयानक पाऊल उचलू शकतो असं कुणालाही वाटत नाही. मात्र पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर पुराव्यांच्या मदतीने आरोपीचा शोध लावला जाईल. सध्या पोलिस सिद्धार्थचा शोध घेत आहेत.
