AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीच्या औषधांमुळे दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू?, डॉक्टरांचा बोलण्यास नकार, कुठे घडली धक्कादायक घटना?

दोन महिन्यांच्या बाळाला नियमित डोससाठी महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली. बाळाला डोस देण्यात आले. त्यानंतर ताप आल्यास गोळीही देण्यात आली. पण त्यानंतर जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

चुकीच्या औषधांमुळे दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू?, डॉक्टरांचा बोलण्यास नकार, कुठे घडली धक्कादायक घटना?
इंजेक्शन दिल्याने दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यूImage Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Jun 14, 2023 | 2:05 PM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक महिला तिच्या दोन महिन्यांच्या बाळाला उल्हासनगर कॅम्प 5 मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात डोस देण्यासाठी घेऊन गेली. डोस घेतल्यानंतर ताप आल्यास बाळाला पाजण्यासाठी गोळीही दिली. त्याप्रमाणे रात्री महिलेने बाळाला गोळीही पाजली. मात्र यानंतर बाळाची तब्येत बिघडली आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलाला इंजेक्शन दिले

उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात राहणारी एक महिला आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला मंगळवारी दुपारी उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली होती. यावेळी बाळाच्या दोन पायांवर दोन आणि हातावर एक असे 3 इंजेक्शन तिथल्या डॉक्टरांनी दिले. तसंच बाळाला ताप येऊ नये यासाठी एक गोळी सुद्धा रात्री झोपताना देण्यास सांगितली. त्यानुसार महिलेने बाळाला इंजेक्शन घेऊन घरी नेलं आणि रात्री झोपताना गोळीही बाळाला दिला.

मध्यरात्री मुलाची तब्येत बिघडली अन् मृत्यू

यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बाळाच्या नाकातून फेस आणि रक्त येऊ लागलं. यावेळी काजल यांच्यासह घरातील सर्वजण झोपले होते. पहाटे उठल्यानंतर ही बाब महिलेच्या लक्षात येताच त्यांनी बाळाला घेत मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेतली. मात्र डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मंगळवारी दुपारी बाळाला इंजेक्शन दिल्यानंतर रात्रीपर्यंत बाळ सुखरूप होतं. मात्र रात्री गोळी दिल्यानंतरच बाळाचा मृत्यू झाल्यामुळे एक तर चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे किंवा जास्त पॉवरची गोळी दिल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला असावा, असा आरोप महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

याप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली असून, अन्य बालकांसोबत असा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना विचारलं असता त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.