बहिणीचा फोटो व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याचा राग, तरुणावर चाकू हल्ला, दोन जणांना अटक

ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्रावर चाकू हल्ला केला आहे. आपल्या बहिणीचे फोटो व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला.

बहिणीचा फोटो व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याचा राग, तरुणावर चाकू हल्ला, दोन जणांना अटक
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:10 AM

ठाणे : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच मित्रावर चाकू हल्ला केला आहे. आपल्या बहिणीचे फोटो व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल कण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तरुणाची प्रकृती चिंताजनक

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. रोहित कंजानी याने आरोपीच्या बहिणाचा फोटो आपल्या व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला होता. हे पाहून आरोपी विजय रुपाणी याला राग अनावर झाला. यावरून विजय आणि रोहित यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाली. त्यानंतर थोड्याचवेळात विजय आणि अन्य एक आरोपी पंकज कुकरेजा यांनी रोहितवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात रोहित हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. असे वृत्त आजकत या वृत्तवाहीनीकडून देण्यात आले आहे.

आरोपींना अटक

दरम्यान घटनेनंतर दोनही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस आरोपींच्या मागावर होते. याचदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी हे नेताजी चौकामध्ये येणार आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनेत वापरण्यात आलेला चाकू आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Nana Patekar | नाना पाटेकरांच्या अभिनय कारकिर्दीत नीलकांती पाटेकरांचाही मोठा वाटा, आर्थिक संकटातही दिली साथ!

Mata Vaishno Devi | वैष्णो देवी मंदिर परिसर चेंगराचेंगरी, मृतांच्या नातेवाईकांना जम्मू-काश्मीर सरकार 10, तर केंद्राकडून 2 लाखांची मदत

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं नागूपरची चिंता वाढली

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.