भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत समोर आली आहे.

भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच डॉक्टर फरार

भिवंडी : कोरोनाच्या महामारीत जगभर डॉक्टर रुग्णांचे प्राण (Doctor Molest Minor Girl) वाचवत असण्याचे ईश्वरीय कार्य करत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना भिवंडीत घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीत समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार केली असता अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Doctor Molest Minor Girl).

30 जुलै रोजी चव्हाण कॉलनी परिसरात राहणारी महिला आणि तिची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी या दोघींची प्रकृती बरी नसल्याने दोघीही जवळच्या गुलजार नगर येथील डॉ. बदरुजमा खान यांच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने दोघींवर उपचार करुन औषध देऊन परत दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी बोलावले होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी मुलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नसल्याने आईने मुलीला लहान भावासोबत दवाखान्यात उपचारासाठी पाठविले. मात्र, दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान डॉ. बदरुजमा खान याने मुलीचा तपासणीचा नंबर येऊनही तिला तपासले नाही. तिला सर्वात शेवटी तपासण्यासाठी बोलावले आणि दवाखान्यात काम करणाऱ्या कंपाऊंडरला सुट्टी देऊन पाठवून दिले. तर पीडित 14 वर्षीय मुलीसोबत आलेल्या लहान भावाला सुट्टे पैसे आणण्यासाठी दवाखान्याबाहेर पाठवले. त्यानंतर पीडितेस तपासणीच्या बहाण्याने झोपवून दवाखान्यात कुणीही नसल्याचा गैरफायदा उचलत डॉक्टरने मुलीवर अत्याचार केला (Doctor Molest Minor Girl).

या प्रकाराने भयभीत झालेल्या पीडितेने डॉक्टरला धक्का देऊन तेथून पळ काढला आणि सदर प्रकारानंतर पीडित आपल्या भावसह परिसरातच राहणाऱ्या आपल्या मावशीच्या घरी गेली. तिथे पीडितेने आपल्यासोबत घडलेली हकीकत मावशीला सांगितली. ते ऐकून मावशीला धक्काच बसला आणि तिने पीडित मुलीच्या आईला आपल्या घरी बोलावून घेत सदरचा प्रकार सांगितला.

या धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या आईने घटनेच्या पाच दिवसानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधम डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी डॉक्टर बदरुजमा खानविरोधात कलम 354 ( A ) , 376 (2)( E ) , 376 (C ) ( D ) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. बदरुजमा खान दवाखाना बंद करुन फरार झाला आहे. त्याचा शांतीनगर पोलीस शोध घेत आहेत (Doctor Molest Minor Girl)

संबंधित बातम्या :

आधी ओळख, मग मोठ्या नफ्याचं आमिष, झांबियातील भारतीयांकडून पुणेकर व्यवसायिकांना तब्बल पावणेदोन कोटींना गंडा

विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या, नागपुरात महिलेसह बॉयफ्रेंड रंगेहाथ अटक

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *