यूट्यूब व्हिडीओतून धडे, एमबीए तरुणाची महाविद्यालयीन गर्लफ्रेण्डसोबत घरफोडी

नागपुरात राहणारे शैलेश आणि गौरी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून घरफोडी करण्याच्या पद्धती शिकत असत.

Couple Robs Watching Youtube Video, यूट्यूब व्हिडीओतून धडे, एमबीए तरुणाची महाविद्यालयीन गर्लफ्रेण्डसोबत घरफोडी

नागपूर : यूट्यूबवर घरफोडी करण्याचे व्हिडीओ पाहून नागपुरात चोऱ्या करणाऱ्या युगुलाला पोलिसांनी अटक केली आहे. एमबीए असलेला आरोपी तरुण महाविद्यालयात शिकणाऱ्या मैत्रिणीसोबत घरफोड्या (Couple Robs Watching Youtube Video) करत असे.

29 वर्षीय शैलेश वसंत डुंबरे नागपुरातील हझियापहाड भागात राहतो. त्याची 21 वर्षीय मैत्रीण गौरी गोमडे ही चित्रकला महाविद्यालयात बीएचं शिक्षण घेते. दोघंही जण एकत्र राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पती अंडं खाऊ देत नाही, महिलेचा प्रियकरासोबत पोबारा

शैलेश आणि गौरी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून घरफोडी करण्याच्या पद्धती शिकत असत. दरवाजाचं लॅच तोडण्यासाठी गॅस कटरचा वापर कसा करावा, हे त्यांनी व्हिडीओ पाहून शिकून घेतलं. त्यानंतर घरफोडी करताना याचं प्रात्यक्षिक ते करत असत.

एप्रिल महिन्यात मनकापूर भागातील घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा आरोप शैलेश आणि गौरी यांच्यावर आहे. गोरेवाडा भागातील एका बंगल्यात दोघं भाड्याने राहत होते. दर महिन्याला दोघं दोन किंवा तीन ठिकाणी घरफोडी करत असत.

दोन्ही आरोपींना आलिशान राहणीमानाची सवय लागली होती. चोरीच्या पैशातून त्यांनी एक कारही हफ्त्यावर घेतली होती.

पोलिसांनी आरोपींकडून गॅस कटर गन, ऑक्सिजन सिलेंडर आणि घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारं जप्त केली आहेत. यूट्यूब व्हिडीओतून एटीएम फोडण्याची पद्धत (Couple Robs Watching Youtube Video) शिकत असल्याची कबुली खुद्द आरोपींनी पोलिसांना दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *