बायकोचे दागिने विकले, 79 वर्षीय मुंबईकराला स्पॅनिश मैत्रिणीने दीड कोटींना धुपवलं

सुरुवातीला तक्रारदाराने 50 हजार रुपये भरले. त्यानंतर बायकोचे दागिने विकून त्याने 30 लाखांची रक्कम भरली. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तो घर विकण्याच्या तयारीत होता.

बायकोचे दागिने विकले, 79 वर्षीय मुंबईकराला स्पॅनिश मैत्रिणीने दीड कोटींना धुपवलं

मुंबई : सोशल मीडियावर ओळख झालेल्या स्पॅनिश मैत्रिणीसाठी दिलदारपणा दाखवणं मुंबईतील 79 वर्षीय वृद्धाला चांगलंच महागात पडलं आहे. बायकोचे दागिने विकल्यानंतर घरही विकायला निघालेल्या वृद्धाने आपल्याला दीड कोटींचा गंडा (Spanish woman dupes Mumbai Man) बसल्याचा दावा केला आहे.

तक्रारदार वृद्ध हा मुंबईतील निवृत्त अभियंता आहे. एका युरोपियन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मे महिन्यात त्याची आरोपी स्पॅनिश महिलेशी ओळख झाली. संबंधित 44 वर्षीय महिलेने आपली ओळख विविआन लव्हेट अशी सांगितली होती. आपण संयुक्त राष्ट्रसंघात काम करत असल्याचं तिने सांगितलं होतं. ‘टाइम्स नाऊ’ वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

आपण दागिन्यांची पेटी पाठवत असल्याचं महिलेने एके दिवशी वृद्धाला सांगितलं. वृद्धाने महागडी भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे तिने ही पेटी त्याला अनाथाश्रमात दान करण्यास सांगितलं. त्यानंतर महिन्याभराने तक्रारदार वृद्धाला एका महिलेचा फोन आला. मी कस्टम अधिकारी असून स्पेनमधून आलेल्या पार्सलवर ड्युटी भरण्यास तिने सांगितलं.

आठवड्याभरानंतर त्याच महिलेचा पुन्हा एकदा फोन आला. त्या बॉक्समध्ये परकीय चलन असून एक्स्चेंज ड्युटी भरणं अनिवार्य असल्याचं तिने सांगितलं. सुरुवातीला तक्रारदाराने 50 हजार रुपये भरले. त्यानंतर बायकोचे दागिने विकून त्याने 30 लाखांची रक्कम भरली.

उर्वरित रक्कम भरण्यासाठी तो घर विकण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी अमेरिकास्थित त्याच्या मुलाला संशय आला. मुलाच्या हस्तक्षेपामुळे त्याने घराची विक्री थांबवली. मुंबईतील मुलुंड पोलिसात वृद्धाने तक्रार दाखल केली असून दीड कोटींचा गंडा बसल्याचा दावा केला आहे.

परदेशी तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुंबईत अभिनेत्याला अटक

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. एप्रिल महिन्यातच 65 वर्षीय व्यक्तीने परदेशी महिलेच्या नादाला लागून आयुष्यभराची पुंजी (Spanish woman dupes Mumbai Man) गमावली होती.

परदेशी महिलाही लक्ष्य

परदेशी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एका अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. मीरा रोडचा रहिवासी असलेल्या राज सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीने तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *