धक्कादायक! कोरोना काळात 4 ते 18 वयोगटातील 80% विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घटला; वाचा सर्व्हे काय सांगतो?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 10, 2021 | 2:53 PM

युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) च्या अहवालात हायलाइट करण्यात आले आहे की, वारंवार शाळा बंद केल्यामुळे दक्षिण आशियातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये असमानता निर्माण झाली आहे आणि त्यांचा शैक्षणिक स्तर  देखील घटला आहे.

धक्कादायक! कोरोना काळात 4 ते 18 वयोगटातील 80% विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घटला; वाचा सर्व्हे काय सांगतो?
विद्यार्थी

मुंबई : कोरोनामुळे जवळपास गेल्या दिड वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान अनेक विद्यार्थी शिक्षणापासून देखील दूर गेले आहेत. आता युनिसेफच्या अहवालानुसार, भारतातील 14-18 वर्षे वयोगटातील किमान 80 टक्के विद्यार्थ्यांचा कोरोना काळात शैक्षणिक स्तर घटला झाल्याची नोंद केली आहे. (In corona period the educational level of students is declined about 80%)

युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (UNICEF) च्या अहवालात हायलाइट करण्यात आले आहे की, वारंवार शाळा बंद केल्यामुळे दक्षिण आशियातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये असमानता निर्माण झाली आहे आणि त्यांचा शैक्षणिक स्तर  देखील घटला आहे. त्या अहवालामध्ये म्हटंले गेले आहे की, 5-13 वयोगटातील 76 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कोरोना काळात विद्यार्थांच्या शिक्षणात घट झाल्याचे म्हटंले आहे.

युनिसेफचे दक्षिण आशियाचे संचालक जॉर्ज लारिया-एडझिक म्हणाले की, दक्षिण आशियातील शाळा कोरोनाने बंद झाल्याने लाखो मुले आणि त्यांचे शिक्षक कमी कनेक्टिव्हिटी आणि कमी उपकरणांची उपलब्धता असल्यामुळे संपर्कात देखील राहू शकले नाहीत. विद्यार्थ्यांपर्यंत म्हणावे तसे आॅनलाईन शिक्षण पोहचवू शकले नाहीत. जरी विद्यार्थ्यांच्या घरी आॅनलाईन शिक्षण घेण्यासाठी तंत्रज्ञान असले तरी देखील मुलांना ती वापरता आली नाहीत.

त्यामुळे मुलांना आॅनलाईन शिक्षण घेणे शक्य झाले नाही. भारतात 6 ते 13 वयोगटातील 42 टक्के मुलांनी शाळा बंद होताना कोणत्याही प्रकारचा दूरस्थ शिक्षण न वापरल्याचा अहवाल दिला आहे.  अहवालामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की, पुस्तके, वर्कशीट, फोन किंवा व्हिडिओ कॉल, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, व्हिडिओ क्लासेस इत्यादीच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले नाही.

सर्वेक्षणात असे दिसून आले की शाळा बंद झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचा त्यांच्या शिक्षकांशी फारसा संपर्क नव्हता.  5 ते 13 वयोगटातील किमान 42 टक्के विद्यार्थी आणि 14-18 वयोगटातील 29 टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांशी संपर्क ठेवला नाही,” यामुळे आता युनिसेफने शासनाला सुरक्षितपणे शाळा उघडण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासह, आवश्यकतेनुसार मुलांना दूरस्थ माध्यमाद्वारे शिक्षण मिळू शकेल याची खात्री करण्याचे देखील आवाहन केले आहे.

युनिसेफच्या अहवालात असेही म्हटले आहे की श्रीलंकेतील प्राथमिक शाळेतील मुलांच्या 69 टक्के पालकांनी नोंदवले की त्यांच्या मुलांचा शैक्षणिक स्तर घटला आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यावर बोलताना युनिसेफच्या इंडिया युनिटच्या प्रतिनिधी यास्मीन अली हक म्हणाल्या की, शाळा गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक मुलांच्या अभ्यास, सामाजिक संवाद आणि खेळांवर परिणाम झाला आहे जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

तुम्हाला ताप आहे का? तुमचा ताप डेंग्यू किंवा इतर व्हायरल आहे हे कसे ओळखावे?, वाचा! 

अफगाणिस्तान आणि महाभारताचं अनोखं कनेक्शन, गांधारचं कंधार कसं झालं?

आपल्या आजूबाजूची ‘ही’ माहिती सरकारला द्या आणि मिळवा ‘लाख’ रुपये, जाणून घ्या कसे…

(In corona period the educational level of students is declined about 80%)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI