पतंजली विद्यापीठात कोणते कोर्स शिकवले जातात? प्राचीन आणि आधुनिक शिक्षणाचा कसा घातलाय संगम?
पतंजली विद्यापीठाला NAAC ने A+ ग्रेड प्रदान केले आहे. या विद्यापीठात आयुर्वेद, योग, वैदिक अभ्यासक्रम आणि भारतीय संस्कृती-इतिहासावर आधारित अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बीएमएस, एमडी, पीएचडी (आयुर्वेद), बीएससी, एमएससी, पीएचडी (योग) असे विविध अभ्यासक्रम आहेत.

योग गुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली योग पीठद्वारे चालविण्यात येणाऱ्या हरिद्वार येथील पतंजली विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेने गेल्या वर्षी ए+ ग्रेड दिली आहे. या विद्यापीठाचे कुलपती रामदेव बाबा आहेत. या विद्यापीठातून अनेक कोर्स शिकवले जातात. आधुनिक आणि प्राचीन शिक्षणाची सांगड घालून या ठिकाणी शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यापीठात कोणते कोणते कोर्स शिकवले जातात? त्याची अॅडमिशन प्रोसेस कशी आहे? यावर टाकलेला हा प्रकाश.
पतंजली योग पाठीकाडून पंतजली विश्वविद्यापीठ आणि आचार्य बालकृष्ण आयुर्वेद कॉलेज सारख्या संस्थाही स्थापन केल्या आहेत. या संस्थांमधून पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणाली, विशेष करून आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी ध्यान केंद्रीत केलं जातं. या विद्यापीठातून योग, आयुर्वेद आणि अन्य पारंपारिक भारतीय विषयांवर केंद्रीत अभ्यासक्रम आहेत. तर आचार्य बालकृष्ण आयुर्वेद कॉलेजमध्ये आयुर्वेदिक चिकित्सेशी संबंधित कोर्स चालवले जातात.
कोणते कोर्स शिकवले जातात
पतंजली विद्यापीठाता आयुर्वेदाशी संबंधित अभ्यासक्रम चालवले जातात. त्यात बीएमएस (बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी), एमडी (डॉक्टर ऑफ मेडिसिन) आणि पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)चा समावेश आहे. विद्यापीठात योग विज्ञान संबंधी अभ्यासक्रमही शिकवला जातो. बीएससी (बॅचलर ऑफ सायन्स) योग विज्ञान, एमएससी (मास्टर ऑफ सायन्स) योग विज्ञान आणि पीएचडी योग विज्ञान आदी शिकवले जाते. त्याशिवाय वेद आणि दर्शन शास्त्रही शिकवलं जातं. यात बीए (बॅचलर ऑफ आर्ट्स) वेद आणि दर्शन, एमए (मास्टर ऑफ आर्ट्स) वेद आणि दर्शन आणि पीएचडी वेद आणि दर्शनचा समावेश आहे. बीए भारतीय संस्कृती आणि इतिहास, एमए भारतीय संस्कृती आणि इतिहास, पीएचडी भारतीय संस्कृती आणि इतिहाससहीत अनेक कोर्सचा समावेश आहे.
प्राचीन आणि आधुनिक शिक्षणाची सांगड कशी?
पतंजली विद्यापीठ प्राचीन भारतीय ज्ञानास आधुनिक शिक्षणासोबत जोडण्यासाठी अनेक उपाय करत आहे. योग आणि आयुर्वेद शिक्षेच्या माध्यमातून विद्यापीठ योग आणि आयुर्वेद या प्राचीन भारतीय ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध अभ्यासक्रम चालवते. विद्यापीठात अनेक संशोधन कार्यक्रम आहेत, जे प्राचीन भारतीय ज्ञानाला आधुनिक विज्ञानासोबत जोडण्यावर लक्ष केंद्रित करतात. विद्यापीठ आधुनिक शिक्षण पद्धतींचाही स्वीकार करते. यात ऑनलाइन शिक्षण आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन ज्ञान आधुनिक पद्धतीने शिकण्यास मदत होऊ शकते.
भारतीय शिक्षणाचे शाश्वत मूल्ये पुनर्जीवित होतंय?
पतंजली गुरुकुलम पारंपरिक भारतीय ज्ञान आणि मूल्ये संरक्षित करण्यासाठी आणि त्यांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये अनेक मर्यादा आहेत, जसे की तोंडपाठ करण्याची पद्धती आणि व्यावहारिक ज्ञानाची कमतरता. पतंजली गुरुकुलम या मर्यादा दूर करण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करते. गुरुकुलम भारतीय संस्कृती आणि धर्माच्या महत्त्वाची जाणीव ठेवतो आणि या मूल्यांना शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच वेळी पतंजली विद्यापीठ उद्योग आणि समाजाशी जुळवून घेतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन ज्ञानाला व्यावहारिकदृष्ट्या लागू करण्यास मदत मिळते.
समग्र शिक्षणात अग्रणी आहे?
पतंजली आयुर्वेद शिक्षणा पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञान संरक्षित करण्यावर भर देते. पतंजली आयुर्वेद शिक्षणात आधुनिक शिक्षण पद्धतींचा समावेश केला जातो, जसे की ऑनलाइन शिक्षण आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आदी. पतंजली आयुर्वेद शिक्षणात व्यावहारिक प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक उपचार व चिकित्सा यावर व्यावहारिक ज्ञान मिळते. पतंजली आयुर्वेद शिक्षणात समग्र आरोग्य दृष्टिकोनावर भर दिला जातो, ज्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याला महत्त्व दिले जाते.
राष्ट्रीय विकासाचा खाका कसा तयार होतो?
पतंजली शिक्षणाचा दृष्टिकोन राष्ट्रीय विकासाचा खाका आहे. कारण तो पारंपरिक भारतीय मूल्ये आणि ज्ञानाला आधुनिक शिक्षण पद्धतींसोबत जोडतो. त्यामुळे राष्ट्रीय विकासासाठी तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण मिळते. पतंजली शिक्षणाचा दृष्टिकोण समग्र शिक्षणावर जोर देतो, ज्यात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासाला महत्त्व दिले जाते. पतंजली शिक्षणाचा दृष्टिकोन सामाजिक आणि सांस्कृतिक विकासावर देखील भर देतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना समाज आणि संस्कृतीच्या विकासात योगदान देण्यास मदत मिळते.