AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhule Election Final Result 2024 : धुळ्यात वंचितमुळे लढत रंगली, पण काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी बाजी मारली

Dhule Lok Sabha Election Final Result 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांच्यात तिरंगी लढत झाली. यात शोभा बच्छाव विजयी झाल्या.

Dhule Election Final Result 2024 : धुळ्यात वंचितमुळे लढत रंगली, पण काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी बाजी मारली
DHULE LOKSABHAImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 04, 2024 | 8:08 PM
Share

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी (Dhule loksabha Constituency) भाजपच्या अनेक उमेदवारांची एकच भाऊ गर्दी झाली होती. मात्र, या भाऊगर्दीत दोन वेळा खासदार असलेले सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे (Candidate of BJP Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Candidate of Congress Dr. Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान (Candidate of Vanchit Aghadi Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीमध्ये कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा विजय झाला.

2009 मध्ये भाजपने प्रताप सोनवणे यांना धुळ्यातून उमेदवारी दिली होती. त्यांनी अंबरीश पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुभाष भामरे यांना संधी मिळाली. त्यांनीही अंबरीश पटेल यांच्या विरोधात सव्वालाखांपेक्षा अधिक फरकाने विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने कुणाल रोहिदास पाटील यांना उमदेवारी दिली होती. पण, त्यांचाही भामरे यांनी पराभव केला. या निवडणुकीत भामरे यांचे मतदान वाढले होते. त्यांनी तब्बल सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पाटील यांचा पराभव केला.

धुळे या मतदारसंघासाठी 20 मे रोजी निवडणूक झाली. यंदा 56.61 टक्के मतदान झाले. धुळे अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाची मते येथे निर्णायक ठरली.  येथे भाजपची अनेक वर्ष सत्ता होती. पण, कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन येथील शेतकरी वर्गाची केंद्र सरकारने नाराजी ओढवून घेतली होती.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?