AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालापूर्वीच सोनिया गांधी यांचं मोठं विधान, एका वाक्यात म्हणाल्या; थोडा संयम ठेवा, निकाल…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात असल्याने भाजप नेते निश्चिंत झाले आहेत. मात्र, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एक महत्त्वाचे स्टेटमेंट दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

निकालापूर्वीच सोनिया गांधी यांचं मोठं विधान, एका वाक्यात म्हणाल्या; थोडा संयम ठेवा, निकाल...
sonia gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2024 | 12:26 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला अवघे काही तास उरले आहेत. मात्र, एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र, इंडिया आघाडीला एक्झिट पोल मान्य नाहीयेत. स्वत: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला संयम ठेवावा लागेल. वाट पाहावी लागेल. फक्त संयम ठेवा आणि मग पाहा. लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या उलट असतील याची आम्हाला पूर्ण आशा आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी पहिल्यांदाच एक्झिट पोल आल्यानंतर प्रतिक्रिया दिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रतिक्रियेला महत्त्व आलं आहे.

एक्झिट पोल आले आहेत. त्यात मोदी सरकार तिसऱ्यांदा येत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, इंडिया आघाडीचे नेते एक्झिट पोल मानायला तयार नाहीत. रविवारी याबाबत राहुल गांधी यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी हे एक्झिट पोल नाहीत, तर मोदी पोल आहेत, असं म्हटलं होतं. आमची सत्ता येईल. आम्हाला विश्वास आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया आल्यानंतर उद्या नेमकं काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एक्झिट पोलमध्ये काय?

TV9 च्या एक्झिट पोलमध्ये 543 जागांपैकी भाजप आघाडीला 346 जागा मिळताना दिसत आहेत. तर इंडिया आघाडीला 162 जागा मिळताना दिसत आहे. इतर पक्षांना 35 जागा जातील अशी आशा आहे. मतांच्या टक्केवारीवर नजर मारल्यास भाजपच्या मताची टक्केवारी वाढताना दिसत आहे. भाजप आणि एनडीएला 47.28 टक्के मते मिळताना दिसत आहेत. तर इंडिआ आघाडीला 36.03 टक्के मते मिळताना दिसत आहेत. इतरांना मिळून 16.69 टक्के मते मिळताना दिसत आहेत. इतर एजन्सीज आणि न्यूज चॅनलच्या सर्व्हेतही अशाच प्रकारचे आकडे दिसत आहेत. परंतु हे पोल्स विरोधी पक्षांनी नाकारले आहेत. 4 जून रोजीचा निकाल आमच्या बाजूने येईल असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

इंडिया आघाडीला काय आशा?

इंडिया आघाडीने एका पत्रकार परिषदेत आकडे शेअर केले होते. आम्हाला 295 जागा मिळतील असा दावा इंडिया आघाडीकडून केला जात आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 40-40 जागा मिळतील असा दावा इंडिया आघाडीकडून केला जात आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा