AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election Result 2026: दोन मुसलमान नेत्यांनी ममता बॅनर्जींना डुबवलं, हायपरसोनिक झटका, भाजपच्या वादळात टीएमसीची धुळधाण

टीएमसीमधून हकालपट्टी झालेले हुमायून कबीर आणि फाल्टा येथील टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी ममता दिदींना चांगलीच टक्कर दिल्याचे चित्र आहे.

West Bengal Election Result 2026: दोन मुसलमान नेत्यांनी ममता बॅनर्जींना डुबवलं, हायपरसोनिक झटका, भाजपच्या वादळात टीएमसीची धुळधाण
mamata banerjeeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 04, 2026 | 11:59 AM
Share

पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली असून भाजप आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि डाव्या आघाडीची स्थिती अत्यंत बिकट आहे. भाजप सातत्याने आपली आघाडी वाढवत असल्याने, यावेळी ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला कोसळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, तर राज्यात ‘कमळ’ फुलण्याची शक्यता प्रबळ होत चालली आहे.

पश्चिम बंगालमधील २६६ जागांचे कल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. यापैकी ११२ जागांवर ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष आघाडीवर आहे. भाजप १५० जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस १ जागेवर आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे, या कलानुसार भाजप बंगालमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. टीएमसीमधून हकालपट्टी झालेले हुमायून कबीर आणि फाल्टा येथील टीएमसीचे उमेदवार जहांगीर खान यांनी हिंदू भावनांना तीव्रपणे भडकवले असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम आता निकालामध्ये दिसून येत आहे.

फाल्टा मतदारसंघात फेरमतदान आणि मतमोजणीत बदल

निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व २८५ मतदान केंद्रांवर २१ मे रोजी पुनर्मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेचा निकाल २४ मे रोजी जाहीर केला जाईल. त्यामुळे, सोमवारी २९४ पैकी २९३ जागांचीच मतमोजणी होणार आहे. यावेळी मतमोजणी प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी आयोगाने केंद्रांची संख्या ७७ पर्यंत मर्यादित केली आहे (जी २०२१ मध्ये १०८ आणि २०१६ मध्ये ९० होती).

अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा कवच तैनात करण्यात आले आहे:

पहिली परत (सर्वात आत): मतमोजणी कक्षात केवळ केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान असतील.

दुसरी परत: केंद्राच्या परिसरात राज्य पोलीस आणि केंद्रीय दलांची संयुक्त तैनाती असेल.

तिसरी परत (बाहेर): बाह्य सुरक्षेची जबाबदारी कोलकाता आणि पश्चिम बंगाल पोलिसांकडे असेल.

प्रवेशासाठी क्यूआर कोड (QR Code) द्वारे पडताळणीची त्रिस्तरीय प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच नंदीग्रामच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाईल फोनवर बंदी आणि अतिरिक्त पर्यवेक्षक

पारदर्शकता जपण्यासाठी मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यावर कडक बंदी आहे. केवळ निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच मोबाईल बाळगण्याची परवानगी असेल. आयोगाने मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी १६५ अतिरिक्त निरीक्षक आणि कायदा सुव्यवस्थेसाठी ७७ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक आयोगाची भूमिका

मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित, शांततापूर्ण आणि पारदर्शक पार पाडणे हा आयोगाचा मुख्य उद्देश आहे. २०२१ च्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) ७०० कंपन्यांना पुढील आदेशापर्यंत राज्यात तैनात ठेवण्यात आले आहे. कोणत्याही अडथळ्याविना आणि निष्पक्षपातीपणे निकाल घोषित करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे.

Follow Us
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर
करुणा मुंडे यांना किती मिळाली मते? चकित करणारी आकडेवारी समोर.
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का
तमिळनाडूत राजकीय उलथापालथ; टीव्हीके सर्वात मोठा पक्ष, डीएमकेला धक्का.
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना
मोठी बातमी! कलांनुसार आघाडीवर असताना सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना.
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके.....
तमिळनाडूत मोठा राजकीय धक्का; विजयच्या टीव्हीकेची आघाडी, डीएमके......
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये
प.बंगालमध्ये भाजपा 24 जागांवर पुढे तर टीएमसी...सुरुवातीच्या कलांमध्ये.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी.
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?
तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?.
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?
पोटनिवडणुकीत आघाडीचे चित्र स्पष्ट; बारामती-राहुरीत पुढे कोण?.
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत
पहिल्या कलांमध्ये भाजप आघाडीवर, टीएमसीची जोरदार लढत.
केरळमध्ये एलडीएफ-यूडीएफमध्ये काट्याची टक्कर
केरळमध्ये एलडीएफ-यूडीएफमध्ये काट्याची टक्कर.