बंगालमध्ये प्रशांत किशोरांची भविष्यवाणी खरी ठरणार!

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांच्या कलानुसार प्रशांत किशोर यांनी भाजपबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसताना आहे. (Prashant Kishor Prediction BJP )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:36 PM, 2 May 2021
बंगालमध्ये प्रशांत किशोरांची भविष्यवाणी खरी ठरणार!
Prashant Kishor Narendra Modi

कोलकाता: प्रसिद्ध राजकीय रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी  यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी काम केले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली होती. त्यात त्यांनी भाजपला 100 पेक्षा कमी जागा मिळतील असा दावा केला होता. सध्याच्या कलांनुसार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरताना दिसताना आहे. (Prashant Kishor prediction for West Bengal Election 2021 that BJP will struggle for crossing two digits may be came true)

प्रशांत किशोर नेमकं काय म्हणाले होते?

‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपण भाजपला बंगालमध्ये 100 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला होता.

पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर

पश्चिम बंगालच्या 294 जागांपैकी 204 जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर भाजप 83 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 1 जागेवर तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत. ममता बॅनर्जींनी दुखापत होऊन केलेला झंझावती प्रचार याच्या जोरावर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये कमबॅक करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

West Bengal Election: ‘बंगालच्या हिंदू मतदारांना भाजपविषयी तितकसं ममत्व नाही; भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत’

(Prashant Kishor prediction for West Bengal Election 2021 that BJP will struggle for crossing two digits may be came true)