AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या ‘या’ सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही…

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आपले नशीब अजमावतात. मात्र, त्यांच्या चित्रपटांना धमााका करण्यात यश मिळत नाही. अनेकांचे पहिलेच चित्रपट हीट ठरतात आणि ते यशाची शिखरे गाठतात. बऱ्याचवेळा मोठ्या कलाकारांच्या मुलांना देखील बॉलिवूडमध्ये यश मिळवता येत नाही.

ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या 'या' सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही...
Puru Rajkumar
| Updated on: Sep 21, 2024 | 4:12 PM
Share

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स हे सुरूवातीपासूनच चर्चेत असणारे विषय ठरले आहेत. जवळपास सर्वच अभिनेत्यांच्या मुलांना बॉलिवूडमध्ये पर्दापण करायचे असते. आता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे तर दुसरीकडे मुलगा आर्यन खान हा देखील बॉलिवूडमध्ये लवकरच पर्दापण करणार आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अर्थात अगस्त्य नंदा यानेही बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. अनेक दिग्गज कलाकारांच्या मुला मुलींनीही बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावले आहे. जेंव्हाही जबरदस्त स्टाइल आणि अनोख्या स्टाइलच्या दमदार अभिनयाची चर्चा होते तेव्हा सुपरस्टार राजकुमारचे नाव नेहमीच घेतले जाते.

राजकुमार हे एखाद्या चित्रपटामध्ये असले म्हणजे तो चित्रपट हीट होणार म्हणजे होणारच असे एक गणित ठरलेले होते. राजकुमार यांना जे कमावता आले ते कधीच त्यांच्या मुलाला जमले नाही. राजकुमार यांचा मुलगा पुरू राजकुमार याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याला अजिबातच यश मिळाले नाही. ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूर यासारख्या अभिनेत्रींसोबत त्याने काम केले. 

हेच नाही तर त्याने आपल्या वडिलांचे नाव देखील लावले, असे करूनही त्याच्या चित्रपटांना अजिबातच यश मिळाले नाही. सतत पुरू राजकुमारचे चित्रपट फ्लॉप होताना दिसले. शेवटी वैतागून पुरू राजकुमार याला चित्रपटसृष्टीच सोडावी लागली. विशेष म्हणजे अनेक मोठ्या संधी पुरू राजकुमारला मिळाल्या. मात्र, त्याला संधीचे कधीच सोने करता आले नाही. 

मुळात म्हणजे पुरू राजकुमार याचे खरे नाव हे पुरू राव पंडित आहे. चित्रपटसृष्टीत पर्दापण करण्याच्या अगोदर त्याने आपल्या वडिलांचे नाव आपल्या नावासोबत जोडले. लहानपणापासूनच पुरू राजकुमार याचे अभिनेता होण्याचे स्वप्न होते. खूप अगोदरपासून त्याने त्यासाठी तयारी देखील केली होती. मात्र, त्याचे चित्रपट धमाका करूच शकले नाहीत. 

पुरू राजकुमारने ब्रह्मचारी चित्रपटातून 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे पुरू राजकुमारला प्रकाश मेहराने त्यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. पुरू राजकुमार आणि करिश्मा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. ऐश्वर्या रायसोबतही काम केले. मात्र, त्याच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळालेच नाही. 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.