AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan : ‘मला काय पागल कुत्रा चावलाय…’, असं का बोलून गेला आमिर खान, गुपचूप करतो ‘हे’ काम?

Aamir Khan : इंडस्ट्रीमध्ये आमिर खान गुपचूप करतो असं काम? एक प्रश्न विचारताच म्हणाला, 'मला काय पागल कुत्रा चावलाय...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याची चर्चा...

Aamir Khan : 'मला काय पागल कुत्रा चावलाय...', असं का बोलून गेला आमिर खान, गुपचूप करतो 'हे' काम?
अभिनेता आमिर खान
| Updated on: May 17, 2026 | 8:20 AM
Share

अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर आमिर स्पष्ट बोलतो देखील. सांगायचं झालं तर, बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये आमिर खान याच्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. फिल्म इंडस्ट्री आणि मीडियामध्ये अशा देखील चर्चा रंगतात की, आमिर खान फक्त अभिनय करत नाही तर नाही तर, सेटवर दिग्दर्शकाला बाजूला करून गुपचूप दिग्दर्शन देखील करतो. म्हणजेच आमिर Ghost Directing असं म्हटलं जातं. पण यावर आता खुद्द आमिर खान याने मौन सोडलं आहे. आमिर खान स्पष्ट शब्दात म्हणाला, 38 वर्षांच्या करियरमध्ये मी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर फक्त आणि फक्त एका सिनेमासाठी दिग्दर्शन केलं आहे.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात आमिर खान याला ‘घोस्ट डायरेक्टिंग’ बद्दल विचारण्यात आलं. अशात अभिनेत्याने सर्व चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्यातं सांगितलं. शिवाय नाराजी व्यक्त करत म्हणाला, ‘सर्वात आधी तुम्हा सर्वांना कळलं पाहिजे की, माझ्या करियरच्या 38 वर्षांपर्यंत मी सिनेमांमध्ये काम केलं आहे, तर फक्त आणि फक्त एका सिनेमासाठी दिग्दर्शन केलं आहे, तो सिनेमा आहे ‘तारे जमीन पर’ बाकी कोणत्याच सिनेमासाठी मी दिग्दर्शन केलेलं नाही.

‘नकोत्या अफवा पसरत असल्या तरी त्याचा मला काहीही फरक पडत नाही. मीडिया कायम असा दावा करते की, मी सिनेमांमध्ये घोस्ट डायरेक्टिंग करतो. माझा स्पष्ट प्रश्न आहे, मी असं का करेल? जर पडद्याच्या मागे राहून मी चांगलं काम करु शकतो, तर मी त्याचं श्रेय दुसऱ्या कोणाला का देऊ? मला काय पागल कुत्रा चावला आहे? या चर्चा फक्त अफवा आहेत आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही.’ असं देखील आमिर खान म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘मी ज्या ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे, त्या प्रत्येक दिग्दर्शकाच्या काम करण्याचा एक वेगळा अंदाज आहे. जर सर्व सिनेमाांच्या दिग्दर्शनात माझा पुढाकार असता तर, प्रत्येक सिनेमा कुठेना कुठे एक सारखा वाटला असता…’ एवंढच नाही तर, उदाहरण देत आमिर म्हणाला, ‘लगान’, ‘रंग दे बसंती’, ‘सरफरोश’, ‘3 इडियट्स’ सिनेमे एकमेकांपासून फार वेगळे आहेत. कारण प्रत्येक प्रत्येक दिग्दर्शकाची शैली आणि सिनेमाकडे पाहण्याचा अंदाज वेगळा आहे… मी कधीच कोणत्याच दिग्दर्शकाच्या कामाच्यामध्ये आलेलो नाही. सिनेमाच्या यशाचं पूर्ण श्रेय संपूर्ण टीमला जातं… असं देखील अभिनेता आमिर खान म्हणाला.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.