अभिनेत्रीवर गँगरेप प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याची निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?
2017मध्ये अभिनेत्रीवर झालेल्या गँगरेप प्रकरणात एका प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. जवळपास 8 वर्षे चाललेल्या या खटल्यानंतर अभिनेत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींना अनेक गोष्टींना समोरे जावे लागते. कधीकधी तर अभिनेत्रींना कामाच्या ठिकाणी अतिशय वाईट वागणूक मिळते. 2017मध्ये एका मल्याळम अभिनेत्रीवर गँगरेप झाला होता. या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेता दिपला अटक करण्यात आली होती. आता दिलीपची केरळमधील एर्नाकुलम जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने याच प्रकरणात 6 आरोपींना मात्र सर्व आरोपांवर दोषी ठरवले आहे.
प्रिन्सिपल सेशन्स जज हनी एम. वर्गीस यांच्या न्यायालयाने सुमारे 8 वर्षे चाललेल्या खटल्यानंतर हा निकाल दिला. एकूण 10 आरोपींमध्ये दिलीप आठव्या क्रमांकाचे होते. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपी क्रमांक १ ते ६ दोषी आहेत, तर दिलीप यांना सर्व आरोपांतून मुक्त करण्यात आले आहे. दोषी ठरलेले ६ आरोपींमध्ये पल्सर सुनील (मुख्य आरोपी), मार्टिन अँटनी, बी. मणिकंदन, व्ही.पी. विजीश, एच. सलीम उर्फ वाडीवाल सलीम, प्रदीप यांचा समावेश आहे.
दिलीप यांच्यावर होते ‘हे’ गंभीर आरोप
संपूर्ण कट रचला गेला होता. त्यासाठी पल्सर सुनीलला 1.5 कोटी रुपये देण्यात आले होते. तसेच त्याने पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण आरोपींना त्यात यश मिळाले नाही. या सर्व आरोपांमुळे दिलीप यांना 2017 मध्ये जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यांनी ८४ दिवस तुरुंगवासही भोगला होता. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला. पोलिसांनी २०१७ मध्येच पहिली चार्जशीट दाखल केली होती, तर नंतर सप्लिमेंटरी चार्जशीटही दाखल झाली.
काय होते आरोप?
या प्रकरणात सर्व आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली अपहरण, बलात्कार, सामूहिक बलात्कार, तोडफोड तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल होते. दिलीप यांना निर्दोष सोडल्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली आहे, तर पीडितेच्या बाजूने लढणाऱ्यांनी मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
