Birthday Special | सिद्धार्थ मल्होत्राने प्रियंकाबरोबर काम करण्यास दिला होता नकार दिला!

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra)आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

Birthday Special | सिद्धार्थ मल्होत्राने प्रियंकाबरोबर काम करण्यास दिला होता नकार दिला!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra)आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटाने केली. पण तुम्हाला माहिती आहे का ? की या चित्रपटाआधीही सिद्धार्थला एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती आणि ती देखील प्रियंका चोप्रा सोबत मात्र, सिद्धार्थने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.सिद्धार्थने प्रियंका चोप्रा सोबत काम करण्यास नकार दिला होता. जिच्याबरोबर बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेता काम करण्यास इच्छूक असतो. (Actor Siddharth Malhotra’s 36th birthday today)

यामागे सिद्धार्थची ही मजबूरी होती. सिद्धार्थला प्रियांकाच्या ‘फॅशन’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, पण एका मासिकाबरोबर झालेल्या करारामुळे सिद्धार्थ या चित्रपटात काम करु शकला नाही. चित्रपटात करण्याच्या पुर्वी सिद्धार्थ मॉडेलिंग विश्वाचा लोकप्रिय चेहरा होता.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत आहे. सिद्धार्थचे नाव कियारा अडवाणी हिच्याशी जोडले जात आहे. इतकेच नाही तर दोघेही नवीन वर्षाच्या दिवशी मालदीवमध्ये एकत्र सुट्टीवर गेले होते. जरी दोघांनी एकत्र फोटो शेअर केले नसले तरी ते विमानतळावर दोघांना एकत्र जाताना आणि नंतर सुट्टीवरून परत जाताना पाहिले गेले. जेव्हा दोघांना एकमेकांबद्दल प्रश्न विचारले असता तेव्हा ते दोघेही एकमेकांना मित्र असल्याचे सांगतात.

कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये कियाराला रिलेशनशिप बद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाले की, मी लग्न करणार आहे, तेव्हाच मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगेन. मात्र, तीने कुठेही सिद्धार्थचे नाव घेतले नाही. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटबद्दल बोलायचे झाले तर आता तो ‘शेरशाह’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी सिद्धार्थच्या विरूद्ध आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्यातील बातमी सुरू झाली. मात्र, अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या : 

OMG | प्राची देसाईला व्हीलचेयरवर पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Guest List : वरुण-नताशाचं लगीन; सलमान ते कतरिना बनणार वऱ्हाडी!

(Actor Siddharth Malhotra’s 36th birthday today)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI