Sushant Singh Rajput Suicide Investigation | सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा, आतापर्यंत 16 जणांचे जबाब

Sushant Singh Rajput Suicide Investigation | सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा, आतापर्यंत 16 जणांचे जबाब

करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची.

Nupur Chilkulwar

|

Jun 20, 2020 | 9:29 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Investigation) प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आज या प्रकरणात सुशांतची कायदेशीर सल्लागार अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानिचा जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर अ‍ॅडव्होकेट प्रियांका यांनी काहीही बोलण्यास नकार दिला (Sushant Singh Rajput Suicide Investigation).

तसेच, यशराज फिल्म्स तर्फे सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या कराराचे कागदपत्र वांद्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. पोलीस या संपूर्ण कागदपत्रांचा बारकाईने तपास करत आहे. पोलिसांनी सुशांतच्या चार्टर्ड अकाऊंटला बोलविला आहे.

सुशांत दर दोन वर्षांनी मॅनेजरची टीम बदलायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दर 2 वर्षांनी सुशांत आपल्या मॅनेजरची टीम बदलत होता. ही टीम त्याच्यासोबतच असायची. पोलीस सर्व मैनेजर्सचे जबाब घेत आहेत. त्यांनी दिलेले जबाबाची सत्यता तपासत आहेत. या प्रकरणात पुढे अजूनही तपास सुरु आहे.

पोलिसांनी आतापर्यंत कोणा-कोणाचे जबाब नोंदवले

 • के. ले. सिंग, सुशांतचे वडील
 • नितु सिंग, बहीण
 • मीतू सिंग, बहीण
 • सिद्धार्थ पिठाणी आर्ट डायरेक्ट
 • नीरज, सुशांतचा आचारी
 • केशव, सुशांतचा आचारी
 • दीपेश सावंत, केअर टेकर
 • मुकेश चाब्रा, कास्टिंग डायरेक्टर
 • श्रुती मोदी, बिझनेस मॅनेजर
 • राधिका निहलानी, पीआर
 • रिया चक्रवर्ती, प्रेयसी
 • चावी बनवणारा
 • महेश शेट्टी, मित्र
 • केरसी चावडा, सुशांत वर उपचार करणारे डॉक्टर
 • अ‍ॅडव्होकेट प्रियांका खिमानि, कायदेशीर सल्लागार

Sushant Singh Rajput Suicide Investigation

रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी 

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी (18 जून) जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब रात्री जवळपास आठ वाजता संपला.

कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब

त्याआधी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली .

सुशांतच्या डायऱ्या जप्त

सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल, तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता. आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

सलमान, करण जोहर, एकता कपूरविरोधात तक्रार

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडमधील बड्या प्रस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाण्याची शक्यता आहे. निर्माते-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुशांतला 7 चित्रपटांमधून काढून टाकले गेले होते आणि त्यामुळेच त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले, असा आरोप बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयात दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput Suicide Investigation

संबंधित बातम्या :

सुशांतप्रमाणे अनेक गायकही आत्महत्या करु शकतात, सोनू निगमचे म्युझिक कंपन्यांवर गंभीर आरोप

Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र

Samir Soni | मी सुद्धा आत्महत्या करु शकलो असतो, पण…. : अभिनेता समीर सोनीची पोस्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें