पुल पार्टी, बिकिनीमध्ये अभिनेत्रींचा डीजेच्या तालावर डान्स आणि दारू….अंकिता लोखंडेच्या पतीच्या बर्थडे पार्टीतील ‘त्या’ व्हिडीओने खळबळ
अभिनेत्री अंकिता लोखंडेने अभिनयाच्या जोरावर एक छाप सोडलीये. अभिनेत्रीने मालिकांसोबतच धमाकेदार भूमिका चित्रपटांमध्ये केल्या आहेत. मात्र, एका व्हायरल व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ही तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. ज्यामुळे मोठी खळबळ उडालीये.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. फक्त टीव्ही मालिकाच नाही तर तिने चित्रपटांमध्येही धमाकेदार भूमिका केल्या आहेत. पती विकी जैन याच्यासोबत अनेक रिअलिटी शोमध्ये अंकिता सहभागी होताना दिसतंय. बिग बॉसच्या घरात देखील ही जोडी पोहोचली होती. अंकिता हिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर तिने विकी जैनला डेट करण्यास सुरूवात केली. सध्या सोशल मीडियावर विकी जैन याच्या बर्थडे पार्टीचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
विकी जैनच्या बर्थडे पार्टीचे जोरदार आयोजन करण्यात आले. मात्र, हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसलाय. दारू, पुल पार्टी, डीजे, डान्स आणि बरेच काही या पार्टीमध्ये होताना दिसतंय. या बर्थडे पार्टीमध्ये टीव्ही कलाकार मोठ्या प्रमाणात पोहोचल्याचे बघायला मिळतंय. गाण्यावर काहीजण डान्स करत आहेत तर काही अभिनेत्री पुलमध्ये बिकिनी घालून डान्स करण्यात व्यक्त आहेत.
View this post on Instagram
विकी जैनच्या वाढदिवसानिमित्त खास पुल पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. काहीजण दारू उडवताना देखील दिसत आहेत. सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही पती विकीसोबत फोटोसाठी पोज देत डान्स करताना दिसतंय. मात्र, या पार्टीतील व्हायरल व्हिडीओनंतर अनेकांनी टीका करण्यास सुरूवात केलीये. विकी जैनच्या पार्टीत जास्त करून लाफ्टर शेफ्समधील स्पर्धेक सहभागी झाल्याचे दिसतंय.
काही दिवसांपूर्वीच लाफ्टर शेफ्सचा फिनाले झालाय. लाफ्टर शेफ्समध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे दोघे देखील सहभागी झाले होते. यावेळी सर्वजण धमाल करताना दिसले. आता या व्हायरल व्हिडीओनंतर लोक अंकिता लोखंडे हिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे हिच्या पतीची अशाप्रकारे बर्थडे पार्टी लोकांना अजिबात आवडली नाही. लोक कमेंट करत मोठ्या संख्येने या व्हिडीओवर टीका करत आहेत. अंकिता लोखंडे ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. विकी जैन हा व्यावसायिक आहे.
