शॉवरखाली रोमान्स ; 32 वर्षीय अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून पालक चिडले; अखेर अभिनेत्रीने आई-वडिलांची नाकू घासून माफी मागितली
अशी एक अभिनेत्री जिचे चित्रपटातील बोल्ड सीन पाहून तिचे आई-वडील चिडले होते. तिचे आई शब्द ऐकून तिला एवढं मनाला लागलं होतं कि तिने आई-वडिलांच्यासमोर नाक घासून माफी मागितली होती.

बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन्स किंवा इंटीमेट सीन्स हे आता अगदीच सामान्य झाले आहेत. चित्रपटाच्या पटकथेच्या मागणीनुसार बोल्ड आणि इंटिमेट सीन्स शूट केले जातात. पण हे बोल्ड सीन शूट करताना अनेकदा कलाकारांना अवघडल्यासारखं होतं. विशेषत: अभिनेत्रींसाठी. कारण क्रू मेंबर्ससमोर, संपूर्ण टीमसमोर शूट करणे सोपे नसते. परंतु सेटवरील वातावरण तेवढे कम्फर्ट बनवले जाते जेणेकरून ते आरामात शूट करता येईल. मात्र अशा बोल्ड सीन्सनंतर अभिनेत्रींनी ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. अशीच एक अभिनेत्री जिचे चित्रपटातील बोल्ड सीन पाहून प्रेक्षकांनी नाही तर तिच्या स्वत:च्या आई-वडिलांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी चित्रपटाती तिचे बोल्ड सीन पाहून ‘आम्हाला अशी मुलगी नको…’ असं तिचे आई-वडील म्हणाले होते.
बोल्ड सीन पाहून अभिनेत्रीचे आई-वडील चिडले
ही अभिनेत्री म्हणजे रचिता राम. जी साउथमध्ये प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. 2019 मध्ये तिचा ‘आय लव्ह यू’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक कन्नड चित्रपट आहे, ज्यामध्ये रचिता राम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता उपेंद्र मुख्य भूमिकेत आहेय. हा चित्रपट 2007 मध्ये आलेल्या ‘आय थिंक आय लव्ह माय वाईफ’ या इंग्रजी चित्रपटाचा रिमेक आहे.
अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी वेगळेच घडलं.
या चित्रपटाची कथा मुख्य पात्र संतोषच्या प्रेमाच्या आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या धर्मिका नावाच्या मुलीच्या दृष्टिकोण यावर आधारित आहे. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी वेगळेच घडलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या अभिनयाने फारसे समाधान मिळाले नाही. 2013 पासून चित्रपटांमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री रचिता राम ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक सक्रिय असते. तिचे फॉलोअर्स देखील खूप आहेत. रचिताने ‘बुलबुल’ चित्रपटातील ‘कावेरी’ या भूमिकेतून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. याशिवाय तिने टीव्ही मालिका आणि संगीत व्हिडिओंमध्येही काम केले आहे.
आईचे हे शब्द ऐकल्यानंतर तिने तिच्या आई आणि वडिलांची नाक घासून माफी मागितली
‘आय लव्ह यू’ चित्रपटाच्या पटकथेनुसार तिला एक बोल्ड सीन करायचा होता. पण, तिच्या पालकांना त्यांच्या मुलीने असा सीन करायला नको होता. त्या चित्रपटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत रचिताने तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल सांगितले. हे सांगताना ती रचिता मुलाखतीत तिला अश्रू अनावर झाले होते. तिच्या बोल्ड सीनवरून तिचे पालक फारचं चिडले होते. तिची .ही भूमिका पाहून तिची आई म्हणाली होती, ‘मी तुला अभिनेत्री म्हणून स्वीकारू शकते, पण तुला कधीही मुलगी म्हणून पाहू शकणार नाही.’ आईचे हे शब्द ऐकल्यानंतर तिने तिच्या आई आणि वडिलांची नाक घासून माफी मागितली. होती एवढंच नाही तर पुन्हा अशा भूमिका करणार नसल्याचं तिने वचनही दिलं.
View this post on Instagram
‘आजही माझे वडील मला लहाणच समजतात’
पुढी ती म्हणाली, ‘आजही माझे वडील मला लहाणच समजतात. मी आजही माझ्या वडिलांची माफी मागते. . मी त्यांना आनंदी करण्यासाठी जे काही करू शकते ते करते. त्यांना माझा अभिनय खूप वाईट वाटला होता… माझे वडील म्हणायचे, ‘माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. कुटुंबानंतरही काहीतरी वेगळे आहे. मी माझ्या पालकांसाठी लहान मुलासारखीच आहे आणि म्हणून मला त्याबद्दल खूप वाईट वाटलं होतं’. रचिताने सांगितले की, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांसमोर हे कधीच व्यक्त करू शकत नाही. रचिताची बहीण नित्या देखील एक अभिनेत्री आहे. नित्याने ‘नंदिनी’ या प्रसिद्ध तमिळ मालिकेत नंदिनी आणि गंगा ही दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.
