Urfi Javed : अडल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान उर्फी जावेदला रंगेहात पकडलं? जाणून घ्या पुढे नेमकं काय घडलं

उर्फी जावेद, जी आपल्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. तिला नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं गेलं होतं. महत्वाची बाब म्हणजे एका अडल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान तिला पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं!

Urfi Javed : अडल्ट चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान उर्फी जावेदला रंगेहात पकडलं? जाणून घ्या पुढे नेमकं काय घडलं
Urfi Javed
Image Credit source: ANI
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Apr 28, 2022 | 11:35 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed), जी आपल्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. तिला नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं गेलं होतं. महत्वाची बाब म्हणजे एका अडल्ट चित्रपटाच्या शुटिंग (Adult Film Shooting) दरम्यान तिला पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं! निर्माते रोहित गुप्ता (Rohit Gupta) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऊर्फी एका कार्यालयात दिसत आहे. जिथे ती एका चित्रपट निर्मात्याच्या भेटीसाठी आली आहे. हा एक गुप्त प्रोजेक्ट असल्याचं सांगत निर्माता तिल्या वर्णन करुन सांगतो. या चित्रपटात रणबीर कपूरला खलनायकाच्या रुपात कास्ट केलं गेलं आहे. हे ऐकून उर्फी या प्रोजेक्टबाबत उत्साहित असल्याचं पाहायला मिळतं.

इतकंच नाही तर चित्रपटात नायकाच्या रुपात एका विदेशातील अभिनेत्याला कास्ट केल्याचंही सांगितलं जातं. तर बादशाह या चित्रपटाला संगीत देणार असल्याचंही बोललं जातं. त्यानंतर रोहित एका निर्मात्याच्या नात्याने त्या अभिनेत्याला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन येताना दिसतो, ज्याला चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे. ज्यावेळी उर्फी त्या अभिनेत्याबाबत विचारते तेव्हा तिला तो युगांडाचा असल्याचं सांगितलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Gupta (@ro_hit_hain)

शुटिंगला सुरुवात आणि अचानक पोलीस दाखल

त्यानंतर निर्माता उर्फीला अभिनेत्यासोबत ऑडिशनसाठी आमंत्रित करतो आणि ऑडिशनसाठी तिला एक अजब आणि आश्चर्यकारक संवाद देतो. त्यानंतर लगेच एक पोलिस अधिकारी कार्यालयात दाखल होतो आणि अडल्ट चित्रपटाच्या शुटिंगसाठी तिथे उपस्थित तिन जणांना मारायला सुरुवात करतो. तेव्हा ते तिघे सर्व दोष उर्फीला देत असल्याचं यात पाहायला मिळत आहे.

उर्फी मॅनेजरवर चांगलीच भडकली

या संपूर्ण प्रकारामुळे हैराण आणि नाराज असलेल्या उर्फी आपल्या मॅनेजरला फोन करते. आपल्याला हे कशाप्रकारचं ऑडिशन शेड्यूल केल्याचं विचारत ती त्याच्यावर ओरडायला सुरुवात करते. त्यावर तिचा मॅनेजर ही तिची मस्करी सुरु असल्याचं सांगत यात काहीही वास्तव नसल्याचं सांगतो. उर्फी जावेदला बिग बॉस ओटीटीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली असून आपल्या बोल्ड आणि हटके फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें