AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 14 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात, सासरी सहन केलेला छळ, यातना, 450 सिनेमांमध्ये काम करण्याऱ्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत

अभिनेत्री शेवटच्या क्षणापर्यंत सहन केल्या छळ आणि यातना... 450 सिनेमांमध्ये झळकली... पण शेवटच्या क्षणी कोणीच नव्हत जवळ... अभिनेत्रीचा झालेला दुर्दैवी अंत..., आजही अभिनेत्री असते चर्चेत...

वयाच्या 14 व्या वर्षी अडकली लग्नबंधनात, सासरी सहन केलेला छळ, यातना, 450 सिनेमांमध्ये काम करण्याऱ्या अभिनेत्रीचा दुर्दैवी अंत
| Updated on: Apr 27, 2026 | 3:29 PM
Share

सिनेमांमधील ती ग्लॅमरस अभिनेत्री… एकेकाळी तिचं नाव चाहत्यांच्या तोंडावर होतं. अभिनेत्री तिच्या करियरमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली, पण तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी कधी मिळालीच नाही. सांगायचं झालं तर, फिल्मसृष्टीच्या झगमगीत दुनियेमागे कधीकधी असे काही कडवट सत्य दडलेले असतात, जे ऐकून काळजाचा थरकाप उडतो. अशीच एक कहाणी आहे अभिनेत्री सिल्क स्मिताची, जिचा अंत अत्यंत दुर्दैवी होता. तिच्या मागे-पुढे चाहत्यांची गर्दी असायची, पण शेवटच्या क्षणी अभिनेत्री कोणीच नव्हतं.

त्या काळात सिल्क स्मिता म्हणजे दक्षिण चित्रपटसृष्टीचं एक मोठं आणि लोकप्रिय नाव होतं. तिची एक झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर रांगा लागायच्या. दिग्दर्शक अभिनेत्रीला आपल्या सिनेमात घेण्यासाठी मागेल ती रक्कम द्यायला तयार असायचे. एवढंच नाही, तर एखाद्या सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यावरसुद्धा निर्माते सिल्कचं एक गाणं त्यात खास घालायचे. त्यामागे कारण देखील तसं होतं, अभिनेत्रीची सिनेमात उपस्थिती म्हणजे त्या सिनेमाच्या यशाची हमीच असायची. 450 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं, पण दुर्दैवाने लीड अभिनेत्रीची भूमिका साकारण्याची संधी तिला कधी मिळालीच नाही.

सिल्क स्मिता हिचं खरं नाव विजयलक्ष्मी. आंध्र प्रदेशातल्या एका छोट्याशा गावात अभिनेत्रीचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती, त्यामुळे चौथीनंतर शाळा सुटली. आणि वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी घरच्यांनी अभिनेत्रीचं लग्न एका वयस्कर माणसाशी लावून दिलं. लग्नानंतर स्मिता आयुष्या मोठं वादळ आलं.

लग्नात अभिनेत्रीला मिळालं ते फक्त घरगुती हिंसा आणि यातना. दोनच वर्षांत स्मिता सगळंकाही सोडून रिकाम्या हाताने निघाल्या आणि थेट चेन्नईला पोहोचल्या. तिथे सिनेमाच्या सेटवर मेकअप आणि छोटी-मोठी कामं करत स्मिताने नव्या आयुष्याची सुरुवात केली.

पण अभिनेत्रीने स्वतः मेकअपपर्यंत मर्यादित ठेवलं नाही. तिने झगमगत्या विश्वात स्वतःचं नाव मोठं केलं. अनेक गाण्यावर ठेका धरत त्यांनी चाहत्यांना देखील आपल्या तालावर नाचवलं… पण अभिनेत्रीचा शेवट मात्र प्रंचड दुर्दैवी होता… वयाच्या पस्तिसाव्या वर्षी स्मिता हिने स्वतःचं आयुष्य संपवलं. मृत्यूनंतर अभिनेत्रीचं पार्थिव कित्येक तास त्याच खोलीत तसंच राहिलं, अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल कुणाला कळलंही नाही.

स्वतःचं आयुष्य संपवत अभिनेत्री मागे एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीत लिहिलेलं की, ‘मी एकटी आहे आणि माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही…’, एवढ्या मोठ्या स्टारडमनंतरही असं एकटं जगणं आणि असा एकांतात मृत्यू — हे खरंच हृदय पिळवटून टाकणारं आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘द डर्टी पिक्चर’ हा सिनेमा प्रदर्शित झालेला, ज्यात अभिनेत्री विद्या बालन हिने सिल्कची भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई केली.

Follow Us
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....