AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमीरच्या सांगण्यावरून ‘त्या’ सीनसाठी ‘3 Idiots’नी खरोखरच केलं ‘मद्यपान’, अभिनेता शर्मन जोशीने सांगितला किस्सा!

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Amir Khan), शर्मन जोशी (Sharman Joshi) आणि आर माधवन (R Madhavan) अभिनित ‘3 इडियट्स’ (3 Idiots) हा अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रत्येक दृश्य बर्‍यापैकी संस्मरणीय आहे.

आमीरच्या सांगण्यावरून ‘त्या’ सीनसाठी ‘3 Idiots’नी खरोखरच केलं ‘मद्यपान’, अभिनेता शर्मन जोशीने सांगितला किस्सा!
3 इडियट्स सीन
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 9:04 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Amir Khan), शर्मन जोशी (Sharman Joshi) आणि आर माधवन (R Madhavan) अभिनित ‘3 इडियट्स’ (3 Idiots) हा अनेकांचा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रत्येक दृश्य बर्‍यापैकी संस्मरणीय आहे. विशेषत: ते दृश्य, ज्यामध्ये ‘राजू’, ‘रँचो’ आणि ‘फरहान’ मद्यपान करून ‘व्हायरस’ला यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहतात. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तब्बल 11 वर्षानंतर आता अभिनेता शर्मन जोशी याने ‘त्या’ सीनबद्दल मोठा खुलासा केला आहे (Amir khan, Sharman Joshi And R Madhavan drunk for 3 Idiots film scene).

अलीकडेच आर माधवनच्या वाढदिवसानिमित्त शर्मनने या सीनचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता. चित्रपटातील हा सीन जिवंत वाटावा म्हणून त्याने, माधवन आणि आमीर खान तिघांनीही खरोखर ड्रिंक घेतले होते.

शर्मन जोशीने सांगितला किस्सा…

शर्मन म्हणाला, ‘मला आठवतय की या सीनमध्ये आम्हाला मद्यपान करून, बोमन इराणी सकारात असलेल्या व्हायरसला शिव्या द्यायच्या होत्या. त्यावेळी आमीरनेच सुचवले की, आपण खरोखर मद्यपान करून हा सीन परफॉर्म करायला हवा. आमीर आणि मी ड्रिंक सुरू करणारच होतो, पण मॅडी (माधवन) काही कामामुळे उशिरा आला होता. आमीरने मॅडीला आमच्यासोबत ड्रिंक करण्यास सांगितले. माधवन जास्त मद्यपान करत नाही, परंतु सीनसाठी हे करतोय कळल्यानंतर त्याने पटकन काही ड्रिंक घेतली.’

शर्मन म्हणाला, ‘आम्ही या दृश्यासाठी तयार झालो, त्या वेळेस आम्ही थोडेसे नशेत होतो. पण, ड्रिंक घेत नसलेला मॅडी आमच्यापेक्षा जास्त नशेत होता आणि तरीही त्याने या दृश्यात अतिशय उत्तम काम केले. माधवनचे हे रूप क्वचितच पाहिले जाते, कारण तो फारच कमी मद्यपान करतो. हे दृष्य आम्हा सर्वांसाठीच खूप संस्मरणीय होते. चित्रपटाच्या रिलीजनंतर मी, राजकुमार हिरानी सर आणि मॅडी एका ट्रीपला गेलो होतो आणि तेव्हा देखील खूप मजा आली. मॅडी हा एक सुंदर व्यक्ती आहे. तो सर्वांसोबत लगेचच मिसळतो.’ (Amir khan, Sharman Joshi And R Madhavan drunk for 3 Idiots film scene)

‘थ्री इडियट्स’ आधीही होते एकत्र!

अभिनेता शर्मन जोशी, आर माधवन आणि आमीर खान यांनीही राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातही एकत्र काम केले आहे. या चित्रपटात आमीर आणि शर्मन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होते, तर आर माधवन हवाईदलातील पायलटच्या भूमिकेत होता.

कोरोनाची लागण झाल्यावर म्हणाला…

काही दिवसांपूर्वी माधवनला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी देखील त्याने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती अतिशय मजेशीर पद्धतीने दिली होती. वास्तविक, आमीर खानला कोरोनाची लागण झाल्यानंतरच माधवनसुद्धा या विषाणूच्या विळख्यात अडकला होता.

माधवनने ‘3 इडियट्स’ चा फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘फरहानही रँचोच्या मागे मागे आला आहे. हा विषाणू सुरुवातीपासूनच आपल्यामागे होता, परंतु यावेळी त्याने आम्हाला पकडलं. सर्व काही ठीक आहे आणि लवकरच मी बरा होईन. बरं, अशी पहिलीच वेळ आहे, जेव्हा आम्हाला वाटते आहे की राजूने आमच्याबरोबर येऊ नये.’

(Amir khan, Sharman Joshi And R Madhavan drunk for 3 Idiots film scene)

हेही वाचा :

Disha Patani | FIRच्या वृत्तादरम्यानच दिशा पाटणीने शेअर केला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर रंगली चर्चा!

PHOTO | थोडंसं शूटिंग आणि धमाल मस्ती, ‘माझा होशील ना’च्या सेटवर ‘आमरस’ अन् ‘मिसळ’ पार्टी!

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.