AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold : अमिताभ बच्चन यांच्याकडे सोन्याचं भांडार, अंबानीही होतील थक्क! इतर सेलिब्रिटींकडे किती सोनं?

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी सोन्यामध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. बिग बी आणि जया बच्चन यांच्याकडे असलेल्या दागिन्यांचं मूल्य पाहून अंबानीसुद्धा थक्क होतील. बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींकडे किती सोनं आहे, ते जाणून घ्या..

Gold : अमिताभ बच्चन यांच्याकडे सोन्याचं भांडार, अंबानीही होतील थक्क! इतर सेलिब्रिटींकडे किती सोनं?
अमिताभ बच्चन, कंगना राणौतImage Credit source: Instagram
| Updated on: May 12, 2026 | 12:07 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तर दुसरीकडे देशात सोन्याच्या किंमती गगनाला भिडत आहेत. असं असलं तरी सणासुदीसह लग्नकार्यासाठी सामान्य ग्राहक आणि सेलिब्रिटींकडून सोने खरेदी सुरूच असते. सोनं कितीही महाग झालं तरी शुभमुहूर्तांवर आणि लग्नकार्यात सोन्याची खरेदी आवर्जून केली जाते. अशातच बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे किती सोनं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत श्रीमंत जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्याकडे संपत्ती भरभरून आहेच, शिवाय बिग बी आणि जया बच्चन यांना सोनं खरेदी करण्याची विशेष आवड आहे. म्हणून त्यांनी सोन्यामध्ये बरीच गुंतवणूक केली आहे.

2024 मध्ये निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या आणि पती अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा तपशील दिला होता. या प्रतिज्ञापत्रानुसार, बिग बींकडे जया बच्चन यांच्यापेक्षाही जास्त सोनं आहे. जया बच्चन यांच्याकडे 40.97 कोटी रुपयांचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने आहेत, तर अमिताभ बच्चन यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आहेत. बिग बी आणि जया बच्चन यांच्या सोन्याचं एकत्रित मूल्य जाणून अंबानीसुद्धा थक्क होतील. 2024 च्या प्रतिज्ञापत्रानुसार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांचं एकत्रित मूल्य अंदाजे 95 कोटी रुपये इतकं आहे.

बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनाही सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांचा शौक आहे. 2024 मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 3.39 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आहेत. याआधी 2011 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे जवळपास 5 किलो सोनं आणि 25 किलोहून अधिक चांदी आहे. भाजपच्या आणखी खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्याकडे 6.7 किलोग्रॅम सोनं आहे. त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत जवळपास पाच कोटी रुपयांहून अधिक आहे. याशिवाया त्यांच्याकडे 60 किलो चांदी आणि जवळपास 3 कोटी रुपयांचे हिरेसुद्धा आहेत. स्मृती इराणी यांनी 2024 मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे जवळपास 37.48 लाख रुपयांचे सोने, हिरे आणि चांदीचे दागिने आहेत.

Follow Us
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क.....
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर..
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर.....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर......
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा.....
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा......
हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह....
हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह.....
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची टांगती तलवार?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची टांगती तलवार?.
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.