अंकिता लोखंडेचं स्वयंपाकघरही इतकं लॅवीश; 2 एसी अन्… बरंच काही; फराह खानही अवाक्
अंकिता लोखंडेच्या लक्झरी लाइफची नेहमीच चर्चा होत असते. एवढंच नाही तर तिच्या आलिशान घराचे फोटो. व्हिडीओही तेवढेच चर्चेत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात तिचे लक्झरी किचन दिसत असून तिच्या किचनमध्ये चक्क दोन एसी बसल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हे पाहून फराह खानलाही आश्चर्य वाटलं.

टेलिव्हिजन मध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडे ही टीव्ही मालिकेचा एक प्रसिद्ध चेहरा आहे.तसेच अंकिता आणि तिचा नवरा विकी यांच्या जोडीचीही तितकीच चर्चा असते. बिग बॉसनंतर तर यांची फॅन फॉलोईंग जास्तच वाढली आहे. तसेच आता ही जोडी रिअॅलिटी शोमध्येही दिसते. लाफ्टर शेफमध्ये यांच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अंकिताचा तसा मोठा चाहतावर्ग आहे.
अंकिता आणि विकीच्या लक्झरी लाईफची चर्चा
दरम्यान अंकिता आणि विकीच्या लक्झरी लाईफबद्दल, त्यांच्या आलिशान घराबद्दलही कायम चर्चा होत असते. त्यांच्या घरी कायम पार्टी,कार्यक्रम सुरुच असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या या पार्टीला हजर असतात. त्यांची पार्टीही अगदी शानदार असते. त्यांचे पार्टीचे आणि घराचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. अनेकदा अंकिता तिच्या घरातून रील्स आणि व्हिडीओ बनवत असते तेव्हाही तिच्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळते.
View this post on Instagram
अंकिताच्या लग्झरी किचनमध्ये 2 एसी
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात अंकिता लोखंडेच्या घरी फराह खान गेल्याचे बघायला मिळतंय. व्हिडीओमध्ये अंकिताचं लग्झरी किचन देखील दिसत आहे. एवढचं नाही तर तिच्या किचनमध्ये चक्क 2 एसी लावण्यात आल्याचंही बघायला मिळतंय.
हे पाहून फराह खान गंमतीत टोमणाही मारते. ती म्हणते की,” माझ्या किचनमध्ये एसी नाहीये, कारण दिलीप आमच्याकडे आहे.” यावेळी अंकितासोबत विकी जैन देखील दिसतोय. तसेच व्हिडीओत एक टेबल दिसत असून त्यावर अनेक खाण्याचे पदार्थ ठेवल्याचही पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनाही अंकिताचे हे किचन प्रचंड आवडलं आहे. तिचे हे किचन अत्यंत प्रशस्त असून खास डिझाईन करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा
दरम्यान बिग बॉसमध्ये असताना अंकिताच्या सासूबाई आणि तिची आईचीही चांगलीच चर्चा झाली होती. एवढंच नाही तर तिच्या सासूने काही धक्कादायक विधानेही केली होती. एवढंच नाही तर विकी जैन आणि अंकिताच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील त्यावेळी सुरू झाल्या होत्या. मात्र काही महिन्यांनी हे सर्व व्यवस्थित झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर ही जोडी लाफ्टर शेफमध्ये एकमेकांची साथ देताना दिसले. तसेच या शोमध्ये या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना अंकिता कायमच दिसते.
अंकिता लोखंडेच्या स्वयंपाकघरतही चक्क 2 एसी; फराह खानने उडवली खिल्ली
