AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून आम्ही एकाच घरात पण वेगवेगळ्या बेडरुममध्ये राहतो….; अनुपम खेर यांचा पत्नी किरणबाबत मोठा खुलासा

अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पत्नी किरण खेरबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांच्या एकंदरितच सांगण्यावरून त्यांच्या लग्नात फारच चढ-उतार असल्याचं लक्षात येतं. एवढंच नाही तर ते दोघेही वेगवेगळ्या रुम्समध्ये राहत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

म्हणून आम्ही एकाच घरात पण वेगवेगळ्या बेडरुममध्ये राहतो....; अनुपम खेर यांचा पत्नी किरणबाबत मोठा खुलासा
anupam kher and kirron kherImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2025 | 12:55 PM
Share

अभिनेता अनुपम खेर सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटात केवळ अभिनय केला नाही तर त्यांनी स्वतः त्याचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरूम प्रेम मिळालं आहे. त्यांच्या चित्रपटाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते, ज्यामध्ये अनुपम खेर त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री किरण खेरसह सहभागी झाले होते.

अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नी किरण खेरबद्दल काय म्हटले?

फिल्मफेअरला यावेळेस त्यांनी एका मुलाखतीत आपल्या पत्नीबद्दल तसेच त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दलहील बरेच खुलासे केले आहेत. अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नी किरण खेरबद्दल सांगितले. त्यांनी मुलाखतीत सांगितलेल्या गोष्टींवरून अनुपम खेर आणि किरण यांचे लग्न फारसे चांगले चालत नाहीये. ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत असल्याचं अनुपम यांनी म्हटलं. अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. गौतम बेरीसोबतच्या पहिल्या लग्नात किरण यांनी घटस्फोट घेतल्यानंतर1985 मध्ये त्यांनी अनुपम यांच्याशी लग्न केले. अलीकडेच, अभिनेत्याने खुलासा केला की किरणसोबतचे त्यांचे लग्न फारसे चांगले चालत नाहीये.

“तू काय करतोयस, तू मला बर्बाद करत आहेस”

अनुपम खेर किरणबद्दल म्हणाले की “कधीकधी ती खूप स्पष्ट बोलते, पण नंतर मला कळते की ती याबद्दल अगदी बरोबर बोलत आहे. ती चित्रपट पाहते आणि म्हणते की किती वाईट काम झाले आहे.” अनुपम खेर पुढे म्हणाले की, “त्या काळात ती माझा हात धरून चित्रपटांच्या प्रदर्शनाला जायची आणि जर माझा अभिनय वाईट असला तर ती हळूहळू तिचा हात बाजूला करायची जणू काही तिचा माझ्याशी काही संबंधच नाही. ती म्हणायची, “तू काय करतोयस, तू मला बर्बाद करत आहेस. तू वेडा झाला आहेस.” अनुपम खेर म्हणाले की, सुदैवाने गेल्या 10 ते 15 वर्षांत असे घडलेले नाही कारण मी काही चांगले काम केले आहे.”

अनुपम खेर आणि किरण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये का राहतात?

अनुपम खेर पुढे म्हणाले, “ती भ्रमात आहे. तिला वाटतं की गोष्टी चुकीच्या होतील. आता असं फारसं घडत नाही, पण सुरुवातीला असंच व्हायचं. आता आम्ही वेगवेगळ्या रुम्समध्ये राहतो कारण प्रत्येकाच्या स्वतःच्या सवयी आहेत. नाहीतर मी बाथरूममध्ये गेलो तर तिला वाटतं की मी लिड लावणार नाही. तिला वाटतं की मी लाईट बंद करणार नाही. मी बेडवरून उतरताच ती विचारते, तुम्ही लाईट बंद केली का? आणि मग मी म्हणतो किरण जी, मी अजून आत गेलेलोच नाही. तिचा पुढचा प्रश्न असतो तुम्ही फ्लश केला का? पूर्वी मला याचा खूप त्रास व्हायचा, पण नंतर मी त्यावर हसायला लागलो. मला वाटलं की ती खूप मजेदार आहे.” पुढे अनुपम म्हणाले, “माझ्या वैवाहिक जीवनात चढ-उतार आले आहेत. पण आमच्यासोबत जे राहिले आहे ते म्हणजे करुणा, परस्पर आदर, दयाळूपणा आणि मैत्री. या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”

तर अशापद्धतीने अनुपम यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबदद्ल अनेक गोष्टींचा, किरण यांच्या स्वभावाचा खुलासा केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.