AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनुष्का शर्माच्या बहिणीचा इंटिमेट सीन लीक; पहिल्याच डेब्यू चित्रपटातील सीनने खळबळ

OTT वर इंटीमेट सीन असलेल्या अनेक सीरिज आणि चित्रपट आहेत ज्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली. अशातच आता अनुष्का शर्माच्या बहिणीच्या इंटीमेट सीनने इंटरनेवर खळबळ माजली आहे. तसेच नेटकरी तिला ट्रोलही करतायत.

अनुष्का शर्माच्या बहिणीचा इंटिमेट सीन लीक; पहिल्याच डेब्यू चित्रपटातील सीनने खळबळ
Ruhani SharmaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2025 | 1:59 PM
Share

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे लाँच झाले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव आलं आहे ते अनुष्का शर्माची बहिण रुहानी शर्मा. ‘आग्रा’ चित्रपटामुळे चर्चेत असलेली रुहानी शर्मा आता तिच्या चित्रपटामुळे नक्कीच प्रसिद्ध झाली आहे तसेच. कारण चित्रपटातील तिचा इंटिमेट सीन ऑनलाइन लीक झाल्याचं बोललं जात आहे. रुहानी शर्माचा हा पहिलाच चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय झालंय ते जाणून घेऊयात.

दरवर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. आता बी-टाउनमध्ये आणखी एक सुंदरी स्वतःचे नाव कमावण्यासाठी येत आहे. तेलुगू चित्रपटात नाव कमावल्यानंतर, रुहानी शर्मा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आग्रा चित्रपटासाठी तिचं नाव चर्चेत आहे.कारण या चित्रपटात रुहानीने असा एक इंटिमेट सीन दिला आहे, जो इंटरनेटवर लीक झाला आहे.

रुहानी शर्माचा इंटिमेट सीन लीक

रुहानी शर्माचा सीन लीक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं. त्यानंतर तिनं याविषयी एक पोस्ट शेअर करत तिचं मतही मांडलं होतं. रुहानीला ट्रोल केल्यावर तिनं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं, “अनेक महिन्यांची खूप मेहनत, संयम आणि त्याचा असा अपमान होत आहे. आर्ट फिल्म बनवणं एक कठिण काम आहे. यामध्ये अनेक त्रास, मेहनत, परिश्रम घ्यावी लागते.” दरम्यान आगरा सिनेमाला भारतात रिलीजची परमिशन मिळाली नाही. त्यामुळे हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला. अमेझॉन प्राईमवर हा उपलब्ध आहे. आग्रा सिनेमाने 2023 मध्ये इंडियन फिल्म फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये बेस्ट इंडी फिल्म अवॉर्ड मिळवला होता.

रुहानी शर्मा कोण आहे?

रुहानी 30 वर्षांची असून तिचा जन्म 18 सप्टेंबर 1994 रोजी हिमाचल प्रदेशात झाला. तिने चंदीगडमधून पदवी पूर्ण केली आहे. अभिनेत्री म्हणून पहिल्यांदाच तिने राहुल रवींद्रन दिग्दर्शित तेलुगू चित्रपट ‘ची ला सो’ द्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच ती अनुष्का शर्माच्या बहीण असल्याचं म्हटलं जातं.

यानंतर ती मल्याळम चित्रपट ‘कमला’, तेलुगू चित्रपट ‘हिट- द फर्स्ट केस’ आणि ‘डर्टी हरी’ मध्ये दिसली. या चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल रुहानी शर्माला खूप कौतुक मिळाले आहे. सध्या ती राहुल रॉयच्या ‘आग्रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा होत आहे. गेल्या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता, ज्यामध्ये रुहानीचे खूप कौतुक झाले होते.

खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे रुहानी

रुहानी शर्माचा इंस्टाग्रामवरील अधिकृत फोटो पाहून तुम्ही खऱ्या आयुष्यात किती हॉट आहे याचा अंदाज सहज लावू शकता. ती तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.