AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“खुर्चीवर बसल्याने कोणी सिद्धू बनत नाही..”; हरभजन सिंगचा अर्चनाला टोला?

पाच वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोवर परतले आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

खुर्चीवर बसल्याने कोणी सिद्धू बनत नाही..; हरभजन सिंगचा अर्चनाला टोला?
Archana Puran Singh and Harbhajan Singh
| Updated on: Nov 14, 2024 | 2:39 PM
Share

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठं सरप्राइज मिळणार आहे. पाच वर्षांपूर्वी हा शो सोडून गेलेले नवज्योत सिंग सिद्धू या एपिसोडमध्ये परतणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या एपिसोडचे विविध टीझर सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. एका टीझरमध्ये सिद्धू हे त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर बसलेले दिसून येतात. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांना शोमध्ये परत पाहून अर्चना पुरण सिंगच्या भुवया उंचावल्याचं पहायला मिळालं. पुलवामा हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सिद्धू यांना कपिलचा शो सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांची जागा अर्चनाने घेतली होती. आता आणखी एका नव्या टीझरमध्ये क्रिकेटर हरभजन सिंग अर्चनाला टोमणा मारत असल्याचं दिसून येतंय.

या टीझरमध्ये सिद्धू त्यांच्याच अंदाजात कपिलला म्हणतात, “अब मोटरसायकल नहीं, कार चाहिये, अबे ऑडियन्स सारी कह रही है की सरदार चाहिए (आता मोटरसायकल नको, कार पाहिजे, प्रेक्षक म्हणतायत की आता त्यांना सरदार पाहिजे). आपण शोमध्ये परत यावं अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे ऐकल्यानंतर अर्चना त्यांना म्हणते, “मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्ही योग्य वेळी इथून निघालात.” या वक्तव्यावर क्रिकेटर हरभजन सिंग म्हणतो, “जग काहीही म्हणो पण कोणत्या म्हणण्याने कोणी बुद्धू बनत नाही, खुर्चीवर कोणी बसल्याने सिद्धू बनत नाही.” यामुळे हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?” सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.