AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यात अश्रू, हात जोडलेले… आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया

आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका, सुरांची मलिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. आज 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

डोळ्यात अश्रू, हात जोडलेले... आशा भोसलेंच्या निधनावर मुलाची प्रतिक्रिया
आशा भोसलेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 12, 2026 | 1:34 PM
Share

भारतीय संगीत जगतातील एक अजरामर आवाज आज शांत झाला. लता मंगेशकर यांची बहिण आणि देशातील सर्वात जास्त गाणी गाणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता, आशाताईंच्या निधनावर मुलगा आनंद भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आशा भोसले यांना काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारासाठी तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसले यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे अनेकजण त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत होते. मात्र, आज 12 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा अनंत यांनी रुग्णालयाबाहेर येऊन दिली आहे. ‘मी आनंद भोसले माझी आई श्रीमती आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2, त्या जिथे राहात होत्या, लोअर परेल येथे त्यांना लोकांनी येऊन भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं यासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार होणार आहेत’ असे आनंद भोसले यांनी सांगितले आहे.

निधनाचे काय आहे कारण?

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचं कारण सांगितलं. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता, असंदेखील डॉक्टर म्हणाले. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील असे आशा भोसले यांची नात झनाई भोसलेनं सांगितलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आशा भोसले यांचे निधन झाले आहे.

आशिष शेलार यांनी व्यक्त दु:ख

आशिष शेलार यांनी आशा ताई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दु:खात बुडाला. एका युगाचा अंत झाला. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं आयुष्य आणि प्रवास दु:खाला कवटाळून दुसऱ्याला सुख देण्याचा मार्ग होता. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. संगीत क्षेत्रातील कर्तृत्व जगाला देण आहे. आशाताई आपल्यात राहिल्या नाही. कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल गोष्टी पूर्ण होईल. उद्या सकाळी ११ वाजता वाजल्यापासून लोअर परळला त्यांचं निवासस्थान आहे. ११ ते ३ पर्यंत पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. ४ वाजता शिवाजी पार्कात अंतिम संस्कार होईल. सीएमशी बोलणं झालं. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा