AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | महाअंतिम सोहळ्याकडे वाटचाल, एजाजनंतर आता अभिनव शुक्लाकडे ‘इम्युनिटी स्टोन’

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात येऊन स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या सगळ्या वाटाघाटीतून बिग बॉसला अखेर त्यांचे ‘टॉप 4’ स्पर्धक मिळाले आहेत.

Bigg Boss 14 | महाअंतिम सोहळ्याकडे वाटचाल, एजाजनंतर आता अभिनव शुक्लाकडे ‘इम्युनिटी स्टोन’
| Updated on: Dec 03, 2020 | 11:31 AM
Share

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात सध्या बरीच खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात येऊन स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या सगळ्या वाटाघाटीतून बिग बॉसला अखेर त्यांचे ‘टॉप 4’ स्पर्धक मिळाले आहेत. जास्मीन भसीन, रुबीना दिलैक, राहुल वैद्य आणि एजाज खान या स्पर्धेच्या 14व्या पर्वाचे ‘टॉप 4’ स्पर्धक आहेत. नुकत्याच एका टास्कमध्ये जिंकल्यानंतर अभिनवने ‘इम्युनिटी स्टोन’ अर्थात सुरक्षित राहण्याची ताकद मिळविली आहे. अभिनव शुक्ला (Abhinav Shukla), एजाजसमवेत या खेळाचा फायनलिस्ट ठरला आहे (Bigg Boss 14 Latest update Abhinav Shukla wins immunity stone).

बिग बॉसने घरातील सर्व स्पर्धकांना एक व्हिडीओ दाखविला. या व्हिडीओत बहुतेक सदस्य झोपलेले किंवा शांतपणे पडून राहिलेले दिसले. हा व्हिडिओ दाखवताना त्यांच्या हलगर्जी वृत्तीला अधोरेखित करत बिग बॉसने सगळ्यांना कडक शब्दांत फटकारले. बिग बॉस म्हणाले की, ‘लोकांचे मनोरंजन करण्यासाठी देशभरातील नामांकित सेलिब्रेटींची या घरात निवड केली गेली आहे. परंतु त्यांनी सर्व प्रेक्षकांना निराश केले आहे. यामुळे, बिग बॉस घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडत आहे. ज्या सदस्याला घराबाहेर जायचे आहे, तो जाऊ शकतो.’

अंतिम टप्प्यात स्पर्धकांची खेळी

‘बिग बॉस 14’च्या घरातले चित्र आता पूर्णपणे पालटले आहे. सलमान खानच्या महाअंतिम सप्ताहाच्या घोषणेनंतर या आठवड्यात अनेक धक्कादायक बदल ‘बिग बॉस’च्या घरात दिसून आले आहेत. गेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये जास्मीन भसीन आणि अली गोनीची जोडी तुटलेली आपल्याला बघायला मिळाली. अली गोनी घरातून बेघर झाला आहे. पण सोशल मीडिया हँडल खबरीच्या मते, अलीने आपल्या बेस्ट फ्रेंडमुळे हा कार्यक्रम सोडला. तर, आता जास्मीनही बेघर झाल्याचे कळते आहे (Bigg Boss 14 Latest update Abhinav Shukla wins immunity stone).

जास्मीन भसीन ‘गायब’

‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये जस्मीन भसीन दिसली नाही. मात्र, वैद्यकीय कारण किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जास्मीनला वेगळे ठेवलेले असू शकते. पण जर जास्मीनला खरोखर बिग बॉसच्या घरातून बेघर करण्यात आले असेल तर, चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. बिग बॉसच्या घरातून जास्मीन भसीनला बेघर करण्यात आले असेल तर, तिचा जवळचा मित्र अली गोनी यालाही मोठा धक्का बसू शकतो. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे अली गोनीने जास्मीनसाठी बेघर होण्याचा निर्णय घेतला होता.

(Bigg Boss 14 Latest update Abhinav Shukla wins immunity stone)

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | कविता कौशिकचा एजाजला धक्का, हिंसक वर्तनामुळे घराबाहेर जाणार?

रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.