Bigg Boss 17 Winner 2024: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला विजेता

| Updated on: Jan 29, 2024 | 1:14 AM

Bigg Boss 17 Winner and Grand Finale Event Highlights: 'बिग बॉस 17' शोची ट्रॉफी कोणाच्या नावावर होणार याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली होती. अखेर सलमान खान याने मुनव्वर फारुकी याला विजेता म्हणून घोषिक केलंय...

Bigg Boss 17 Winner 2024: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला विजेता

Bigg Boss 17 Winner and Grand Finale Event Highlights: ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याचं नाव घोषित झालं आहे. मुनव्वर फारुकी याने ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिषेक कुमार रनर-अप ठरला आहे. तब्बल 105 दिवसांनंतर मुनव्वर फारुकीचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ग्रँड फिनालेला सुरुवात झाली होती. टॉप 5 मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे स्पर्धक होते. त्यापैकी अरुण माशेट्टी आणि अंकिता लोखंडे यांचा प्रवास आधी संपुष्टात आला. अंतिम लढत मन्नारा, मुनव्वर आणि अभिषेक या तिघांमध्ये होती. त्यापैकी मन्नारालाही बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. मुनव्वर या सिझनचा विजेता ठरला असून त्याला 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jan 2024 01:05 AM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : मुनव्वरला मिळाले 50 लाख रुपये

    ‘बिग बॉस 17’चं विजेतेपद पटकावणाऱ्या मुनव्वर फारुकीला बक्षीस म्हणून बिग बॉसची ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा कार मिळाली आहे.

  • 29 Jan 2024 12:38 AM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : ‘बिग बॉस 17’ शोचा विजेता मुनव्वर फारूकी

    ‘बिग बॉस 17’ विजेत्याचं नाव घोषित झालं आहे. ‘बिग बॉस 17’ च्या विजेत्याचं नाव मुनव्वर फारूकी आहे…

  • 29 Jan 2024 12:14 AM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' विजेत्यांच्या शर्यतीतून मन्नारा बाहेर, स्वप्न भंगले

    काही तास उरलेला असताना अभिनेत्री मन्नारा चोप्रा हिचा प्रवास संपला आहे. अभिषेक, मुनव्वर कोण जिंकणार 'बिग बॉस 17' शोची ट्रॉफी?

  • 28 Jan 2024 11:41 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' मध्ये खान ब्रदर्सचा जलवा

    'बिग बॉस 17' मध्ये सलमान खान याचे भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांची एन्ट्री...

  • 28 Jan 2024 11:18 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' शोचे टॉप 3 स्पर्धक, अंकिता लोखंडे संपला प्रवास

    काही तास उरलेला असताना अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला स्वीकारावं लागलं अपयश.. कोण जिंकणार 'बिग बॉस 17' शोची ट्रॉफी

  • 28 Jan 2024 10:55 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अब्दु रोझिक याची 'बिग बॉस 17' मध्ये दमदार एन्ट्री

    अब्दु रोझिक याने माधुरी दीक्षित हिच्यासाठी गायलं 'पेहला पेहला प्यार हैं' गाणं...

  • 28 Jan 2024 10:50 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईंनी धरला ठेका

    सलमान खान, सुनील शेट्टी, माधुरी दीक्षित यांच्यासोबत अंकिता लोखंडे हिच्या सासूबाईंनी धरला ठेका

  • 28 Jan 2024 10:27 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : सलमान - सुनील यांचा दमदार डान्स

    रंगतोय 'बिग बॉस 17' फिनालेचा रंग... सलमान - सुनील यांचा दमदार डान्स

  • 28 Jan 2024 10:11 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : माधुरी हिच्यानंतर शोमध्ये सुनील शेट्टी यांची एन्ट्री

    रंगतोय 'बिग बॉस 17' फिनालेचा रंगत माधुरी हिच्यानंतर शोमध्ये सुनील शेट्टी यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

  • 28 Jan 2024 10:05 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' मध्ये माधुरी दीक्षित हिची एन्ट्री, सलमान याने केलं मोठ्या थाटात स्वागत

    अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे गाणं म्हणत सलमान खान याने मोठ्या खास अंदाजात माधुरी दीक्षित स्वागत...

  • 28 Jan 2024 09:56 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : टॉप 5 मध्ये पोहोचलेल्या अरुण माशेट्टी याचा प्रवास संपला

    बिग बॉस 17 चे टॉप 4 स्पर्धक समोर आले आहेत. टॉप 5 मध्ये पोहोचलेल्या अरुण माशेट्टी याचा प्रवास संपला आहे. अजय देवगन, आर माधवन यांनी टॉप 5 मधून बाहेर झालेल्या स्पर्धकाची घोषणा केली.

  • 28 Jan 2024 09:50 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' मध्ये अजय देवगन, आर माधवन यांची एन्ट्री

    'बिग बॉस 17' मध्ये अजय देवगन, आर माधवन यांची एन्ट्री झाली आहेत. दोघे स्पर्धकांसोबत संवाद साधत आहेत..

  • 28 Jan 2024 09:39 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' च्या शर्यतीतून बाहेर?

    अंकिता लोखंडे 'बिग बॉस 17' च्या शर्यतीतून बाहेर आल्याची चर्चा रंगत आहे. आता कोण घरी घेऊन जाणार 'बिग बॉस 17' शोची ट्रॉफी

  • 28 Jan 2024 09:36 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : विकी - अंकिता यांचे रोमाँटिक क्षण

    विकी - अंकिता यांचे रोमाँटिक क्षण... 'कभी खुशी कभी गम' गाण्यावर दमदार डान्स

  • 28 Jan 2024 09:32 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : फिनालेमध्ये ईशा - समर्थ यांना रोमाँटिक डान्स

    फिनालेमध्ये ईशा - समर्थ यांना रोमाँटिक डान्स... सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा - समर्थ यांच्या डान्सची चर्चा...

  • 28 Jan 2024 09:17 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अरुणनंतर आणखी एक स्पर्धक 'बिग बॉस 17' च्या घरातून बाहेर

    अरुण याच्यानंतर अभिनेत्री मन्नारा चोप्रा देखील घरातून बाहेर झाल्याची माहिती मिळत आहे. आता अभिषेक, अंकिता, मुनव्वर कोण असेल 'बिग बॉस 17' चा विजेता?

  • 28 Jan 2024 09:04 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : खुद्द सलमान खान याने घेतली टॉप 5 स्पर्धकांची भेट...

    अंकिता, मन्नारा, अभिषेक, मुनव्वर, अरुण कोण जिंकणार 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. खुद्द सलमान खान याने घेतली टॉप 5 स्पर्धकांची भेट...

  • 28 Jan 2024 08:34 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अरुण माशेट्टी 'बिग बॉस 17'च्या घराबाहेर, व्हिडीओ समोर

    'बिग बॉस 17' मधील टॉप 5 स्पर्धकांमधून अरुण माशेट्टी घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. अरुण याचा घराबाहेर पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 28 Jan 2024 08:26 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अभिषेक सर्वात जास्त घमंडी - ईशाने साधला अभिषेकवर निशाणाा

    अभिषेक सर्वात जास्त घमंडी आहे. आमच्यामध्ये जे काही झालं त्यामुळे अभिषेक याच्यामध्ये काही बदल होतील असं वाटलं. पण असं काहीही झालं नाही... म्हणून अभिषेक याला कानशिलात... असं ईशा म्हणाली...

  • 28 Jan 2024 08:16 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबिय 'बिग बॉस 17' च्या घरात

    'बिग बॉस 17' शोचा विजेता घोषित होण्याआधी टॉप 5 चे स्पर्धकांचे कुटुंबिय 'बिग बॉस 17' च्या घरात आले आहेत. फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 28 Jan 2024 08:12 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : अंकिता लोखंडे - विकी जैन यांचा रोमाँटिक डान्स

    'बिग बॉस 17' शोच्या फिनालेमध्ये अंकिता लोखंडे - विकी जैन यांचा रोमाँटिक डान्स... सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता - विकी यांच्या नात्याची चर्चा...

  • 28 Jan 2024 08:05 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' च्या टॉप 5 मधील 'या' स्पर्धकाचं स्वप्न शेवटच्या क्षणी भंग

    'बिग बॉस 17' मधील टॉप 5 स्पर्धकांमधून अरुण माशेट्टी घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. एक्सवर अरुण माशेट्टी याचा एक फोटो व्हायरल होत आहे.

  • 28 Jan 2024 07:35 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' शोचा विजेता कोण असेल? कृष्णाने सांगितलं विजेत्याचं नाव

    'बिग बॉस 17' शोचा विजेता कोण असेल? असा प्रश्न भारती हिने कृष्णा याला विचारला.. यावर कृष्णा विनोदी अंदाजात याने मनस्वी हिचं नाव घेतलं. मनस्वी पहिल्याच आठवड्यात शोमधून बाहेर झाली.

  • 28 Jan 2024 07:15 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : ऑरीसोबत सेल्फी घेण्याची संधी तीन स्पर्धकांना

    अंकिता, समर्थ आणि अभिषेक यांना ऑरीसोबत सेल्फी घेण्याची संधी... ऑरीने घेतली तीन स्पर्धकांसोबत सेल्फी

  • 28 Jan 2024 07:06 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : ऑरी याच्या फॅशन शोला सुरुवात, स्पर्धक करणार रॉम्प वॉक

    ऑरी याच्या एन्ट्रीमुळे 'बिग बॉस 17' शोमध्ये आनंदाचं वातावरण... शोमध्ये ऑरी याच्या फॅशन शोला सुरुवात... इमोजी मधून ऑरी देणार स्पर्धकांना पॉइंट

  • 28 Jan 2024 06:49 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'किसी के हात ना आयेगा ये लडका...' अवॉर्ड कोणाला...

    विकी, अभिषेक, मुनव्वर, समर्थ... यांना नामांकन मिळाल्यानंतर समर्थ याला 'किसी के हात ना आयेगा ये लडका...' अवॉर्ड मिळाला.

  • 28 Jan 2024 06:47 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'मैं चूप नही रहूंगी अवॉर्ड' कोणाला?

    सुदेश याने 'मैं चूप नही रहूंगी अवॉर्ड' अंकिता लोखंडे, ईशा आणि मन्नारा यांना दिला आहे...

  • 28 Jan 2024 06:45 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'राजकारणावर विनोद नाही...' सुदेश लहरीला बजावलं कृष्णाने

    'राजकारणावर विनोद नाही...' म्हणत कृष्णा याने विनोद करणं किती कठिण आहे... सांगितलं आहे. सुदेश याच्या विनोदांवर स्पर्धक पोट धरुन हसत आहेत...

  • 28 Jan 2024 06:35 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : आम्ही शोमध्ये खूप काही केलं - समर्थ जुरेल

    मुनव्वर याला समर्थ म्हणला, 'आम्ही शोमध्ये खूप काही केलं, मुनव्वर तुझ्यासाठी बाहेर खूप संधी आहेत...' मन्नारा हिचं नाव घेत समर्थ याने मुनव्वर याची खिल्ली उडवली...

  • 28 Jan 2024 06:19 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : मुनव्वरसाठी मन्नारा ट्रॉफी सोडेल?

    मन्नराच्या मनातील भावना सांगत ईशा म्हणते, 'मुनव्वरसोबत माझं नातं फार घट्ट आहे. म्हणून मी त्याला ट्रॉफी दान म्हणून देईल....'

  • 28 Jan 2024 06:13 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : कृष्णा अभिषेक , भारतीच्या कॉमेडीमुळे स्पर्धकांच्या चेहऱ्यावर हासू...

    कृष्णा अभिषेक , भारती यांनी 'बिग बॉस 17' च्या फिनालेमध्ये एन्ट्री करताच... सर्वांना पोट धरुन हसवलं आहे. दोघांनी स्पर्धकांच्या खासगी आयुष्यावर देखील कॉमेडी केली...

  • 28 Jan 2024 05:17 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : मुनव्वर, मन्नारा नाही तर, 'या' दोन स्पर्धकांमध्ये असणार 'कांटे की टक्कर'

    सर्वांना वाटतं मुनव्वर फारुकी होणार 'बिग बॉस 17' चा विजेता, पण असं काहीही नाही... 'या' दोन स्पर्धकांमध्ये असणार 'कांटे की टक्कर' असण्याची शक्यता.. वाचा सविस्तर

  • 28 Jan 2024 04:39 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : 'बिग बॉस 17' च्या ट्रॉफीबद्दल अंकिता लोखंडे हिच्या सासूचं मोठं वक्तव्य

    अंकिता लोखंडे हिच्या सासूला ''बिग बॉस 17' ची ट्रॉफी अंकिता जिंकेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला... यावर अंकिताच्या सासूबाई म्हणाल्या, 'जिंकेल... ट्रॉफी घरी घेवून येईल...' सासूबाईंच्या वक्तव्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचली आहे.

  • 28 Jan 2024 04:23 PM (IST)

    Bigg Boss 17 Grand Finale Live : कधी आणि कुठे पाहता येणार 'बिग बॉस 17' फिनाले?

    बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले चाहते आज संध्याकाळी सहापासून कलर्स टीव्हीवर पाहू शकता. याशिवाय जिओ सिनेमा या ॲपवरही तुम्हाला पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर तुम्हाला ग्रँड फिनाले मोफत पाहाता येणार आहे.

Published On - Jan 28,2024 4:14 PM

Follow us
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.