Bigg boss 19: 2 लग्न, विवाहित गायकासोबत प्रेमसंबंध, किती मुलांची आई आहे कुनिका सदानंद? फार कमी लोकांना माहितीये अभिनेत्रीचं खासगी आयुष्य
अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या 'बिग बॉस 19' च्या घरात स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. शोमुळे चर्चेत असलेल्या कुनिका हिच्या खासगी आयुष्याची देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रोफेशनल आयुष्यात कुनिका हिने यशाचं शिखर गाठलं पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला

बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या अभिनेता सलमान खान याच्या मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल शो बिग बॉस 19 मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये देखील फक्त आणि फक्त कुनिका हिची चर्चा सुरु आहे. घरातील सर्वात सक्रिय स्पर्धक म्हणून देखील कुनिका हिची चर्चा होत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील अभिनेत्रीने स्क्रिन शेअर केली आहे.
प्रोफेशनल आयुष्यात कुनिका हिने यशाचं शिखर गाठलं पण खासगी आयुष्यात अभिनेत्रीने अनेक समस्यांचा सामना केला आहे. कुनिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीने किती वेळा लग्न केलं, किती मुलं आहेत… शिवाय प्रसिद्ध गायकासोबत असलेल्या नात्याबद्दल देखील अभिनेत्रीने खुलासा केलेला.
वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीचं झालं पहिलं लग्न
कुनिका हिने वयाच्या 18 व्या वर्षी स्वतःपेक्षा मोठ्या 13 वर्षीय पुरुषासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने पहिल्या मुलाला जन्म दिला. पण दोघांचं नातं एक वर्ष देखील टिकलं नाही. अखेर कुनिका हिचं पहिलं लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचलं. तिने एकत्र कुटुंबितील घर सोडलं आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, ज्यामुळे मुलाचा ताबा घेण्यासाठी आठ वर्षे कोर्टात लढाई सुरू होती. जेव्हा तिचा मुलगा 14 वर्षांचा होता, तेव्हा त्याने तिला भांडणं थांबवण्यास सांगितलं आणि तिने मुलाचा ताबा तिच्या पहिल्या पतीकडे सोपवला.
प्राण यांच्या मुलासोबत लिव्हइन रिलेशनशिप
घटस्फोटानंतर कुनिका हिला दिग्गज अभिनेते प्राण यांचा मुलगा सुनील सिकंद याच्या प्रेमात पडली. दोघे काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले आणि त्यांचे नाते त्यांनी एन्जॉय केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
कुनिका हिचं दुसरं लग्न
वयाच्या 35 व्य वर्षी कुनिका हिने दुसरं लग्न केलं. तिने अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने मुलाला देखील जन्म दिला. पण काही वर्षांनंतर कुनिका करीयरसाठी पुन्हा मुंबईत आली. 2006 मध्ये कुनिका हिचा दुसरा घटस्फोट झाला. दुसऱ्या मुलाची कस्टडी अभिनेत्रीला मिळाली. लहान मुलाचा सांभाळ अभिनेत्रीने सिंगल मदर म्हणून केला…
प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्यासोबत रिलेशनशिप
1990 च्या दशकात, कुनिकाचं नाव प्रसिद्ध गायक कुमार सानूशी जोडलं गेलं होतं, सानूची पत्नी रीता हिने कुनिकाच्या कारवर हॉकी स्टिकने हल्ला केल्याची चर्चा रंगली होती. कुमार सानू विवाहित असल्यामुळे त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
