AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान रूढीवादी मुस्लिम, तो त्याच्या महिलांना…, बॉलिवूडच्या खान कुटुंबाचं मोठं सत्य अखेर समोर

Salman Khan Family: खान कुटुंबातील महिलांबद्दल मोठं सत्य समोर, दिग्दर्शक म्हणाला, 'सलमान खान एक रुढीवादी मुस्लिम, तो त्याच्या महिल्यांना...', अलायका अरोरा हिच्या कपड्यांबद्दल देखील सलमान खान याला होती अडचण...

सलमान खान रूढीवादी मुस्लिम, तो त्याच्या महिलांना..., बॉलिवूडच्या खान कुटुंबाचं मोठं सत्य अखेर समोर
फाईल फोटो
| Updated on: Sep 09, 2025 | 9:49 AM
Share

Salman Khan Family: अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमाला 15 वर्ष पूर्ण झाली आहे. सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक अभिनव कश्यप याच्या खांड्यावर होती. अभिनेता अरबाज खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होती. दुसरीकडे अरबाज याची पहिली पत्नी मलायका अरोरा हिने सिनेमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण मलायका हिले आयटम गर्ल म्हणून सिनेमात घेण्यास अरबाज याचा नकार होता.. याचा खुलासा नुकतात झालेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप याने केला आहे.

अभिनव कश्यप म्हणाला, ‘खान ब्रदर्स असे कूल दिसतात पण ते एका रुढीवादी मुस्लिम कुटुंबातील आहेत… हेच खरं वास्तव आहे… मलायका हिला गाण्यात घेण्यासाठी अरबाज उत्साहित नव्हता… पत्नी आयटम गर्ल म्हणून ओळखली जाईल.. याची भीती त्याच्या मनात होती. अरबाज आणि सलमान एका रुढीवादी मुस्लिम कुटुंबातील आहे. मलायकाच्या कपड्यांबद्दल देखील सलमानच्या मनात मतभेद होते. त्याच्या घरातील महिलांना कायम पूर्ण कपड्यांमध्ये राहावं असं त्याला वाटतं. त्यामुळे मलायका हिने आयटम सॉन्ग करु नये अशी त्याची इच्छा होती.

पण मलायका एक खंबीर आणि स्वतंत्र महिला आहे, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते. जेव्हा तिला हे गाणं ऑफर करण्यात आले तेव्हा तिने लगेच हो म्हटलं. अरबाजला पटवून देण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. मलायकाने अरबाजला सांगितलं यामध्ये अश्लील असं काही नाही. फक्त डान्स आहे आणि गाण्यात सगळी आपलीच लोकं आहेत. मग भीती कसली? त्यानंतर या गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडले…

सलमान खान देखील गाण्यात झाला सामिल

अभिनव कश्यप म्हणाला, ‘गाणं खूप चांगल्या प्रकारे तयार झालं होतं. अशात सलमान खान याला देखील गाण्याचा एक भाग व्हायचं होतं. सलमान खान गाणं संपल्यानंतर एन्ट्री करेल असं ठरलं होतं. तोपर्यंत सोनू सूट पार्टी करेल. शोले मधील मेहबूबा या गाण्यात दाखवल्याप्रमाणे, अमजद खान मजा करत आहे. माझ्या मनातही तेच विचार आले.

हे गाणे सादर करण्याची ही एक उत्तम संधी होती, एका बाजूला पोलिस सापळा रचत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खलनायक मजा करत आहे. पण सलमान आग्रह करू लागला की, गाणं सर्वात चांगलं आहे, मीही त्यात असायला हवं, म्हणून मी त्याला थोडे आधी गाण्यात एन्ट्री दिली.’ असं देखील अभिनव म्हणाला.

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचं लग्न

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1998 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 2002 मध्ये मुलगा अरहान याचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.