AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवसेनेच्या पायाखालची जमीन..; प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश कोठारेंना जाहीर पाठिंबा

मी मोदीजींचा भक्त आहे, असं वक्तव्य केल्यानंतर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कोठारेंना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

उद्धवसेनेच्या पायाखालची जमीन..; प्रसिद्ध अभिनेत्रीचा महेश कोठारेंना जाहीर पाठिंबा
Uddhav Thackeray and Mahesh KothareImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2025 | 2:16 PM
Share

‘मी भाजप भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे’ असं म्हणून दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे वादात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी बरीच टीका केली. अपघात प्रकरणात सूनबाई अडकल्या आहेत, म्हणून ते अशी मुक्ताफळं उधळतायत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी निशाणा साधला होता. तर महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. याप्रकरणी आता अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती मेघा धाडेनं कोठारेंची बाजू घेतली आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित तिने, महेश कोठारेंना पाठिंबा दर्शविला आहे.

मेघा धाडेची पोस्ट-

‘अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उद्धव सेना जॉइन केली होती, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या. कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली. त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली’, असं तिने लिहिलंय.

‘हे असं झालं कारण, कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले. कोणत्या तिकिटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही. एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे, जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा, तो आता मेट्रोत गार वाऱ्याच वेगाने प्रवास करतोय. जो मुंबईकर आधी ट्रॅफिकमध्ये अडकायचा, आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय. त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली आणि हे सत्यात देखील उतरणार आहे’, अशी टीका तिने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

‘महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं , जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. कारण ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना. छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना’, असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

महेश कोठारे नेमकं काय म्हणाले?

बोरिवलीत आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे म्हणाले होते, “मी भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहेत. आता जर या विभागातून नगरसेवक नसेल तर महापौर निवडला जाईल.”

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.