‘सैयारा’ पाहिल्यानंतर अभिनेता बॉबी देओल खूप रडला, म्हणाला ‘माझ्या मुलाचा….’
सैयाराने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट थिएटरमध्ये सुरु आहे. आता बॉबी देओलनेही या चित्रपटाचं कौतुक करत अहानसाठी आनंद व्यक्त केला आहे. तसेच चित्रपट पाहतना तो स्वत:चे अश्रू रोखू शकला नाही असंही बॉबी म्हणाला.

अहान पांडे आणि अनित पड्डा स्टारर ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याच वेळी, भारतात 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. काहींना हा चित्रपट आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहीजण तर चित्रपट पाहून थिएटरमध्ये रडू लागल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. पण आता एक बॉलिवूड अभिनेताही सैयारामुळे आपले अश्रू रोखू शकला नाही. हा अभिनेता म्हणजे बॉबी देओल.
बॉबी देओल अश्रू रोखू शकला नाही
बॉबी देओलने सांगितलं की तो अहान पांडेच्या दमदार सुरुवातीमुळे खूप आनंदी आहे. त्याने असेही सांगितले की जेव्हा चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहिला तेव्हा तो आपले अश्रू रोखू शकला नाही. कारण अहान त्याच्यासमोर लहानाचा मोठा झाला आहे. त्याचं यश पाहून त्याला स्वत:चे अश्रू रोखता आले नाही. बॉबीला अहानचे बालपणही आठवले.
बॉबीने सांगितले की त्याला ‘सैयारा’ खूप आवडला.
एका वृत्तानुसार बॉबीने सांगितले की त्याला ‘सैयारा’ खूप आवडला. तो खूप आनंदी होता कारण अहान त्याच्यासमोर मोठा झाला आहे. त्याला ते दिवस आठवले जेव्हा अहान लहान होता आणि स्पायडर-मॅनचा ड्रेस घालून पंचिंग बॅगवर पंचिंग करायचा. बॉबी म्हणतो की तो सुरुवातीपासूनच खूप उत्साही आहे.
“माझ्या मुलाने चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे”
अहान पांडेला बॉबी मुलासारखं मानतो. त्यामुळे त्याच्या पदार्पणाबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाला की “माझ्या मुलाने चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले आहे. अहानने ‘सैयारा’च्या प्रदर्शनासाठी 8 वर्षे वाट पाहिली.” बॉबी देओलने अहानला हा चित्रपट कसा मिळाला हे देखील सांगितले. त्याने सांगितले की त्यामागे एक अद्भुत कथा आहे. अहानने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून त्याच्या यशासाठी तो खूप आनंदी असल्याचं बॉबीने म्हटलं. त्यामुळे बॉबीने सांगितले की तो हा चित्रपट पाहताना खूप रडला. त्याने ही एक अतिशय भावनिक कथा असल्याचं म्हटले.
बॉबी देओलने केले मोहित सुरीचे कौतुक
बॉबी देओल ‘सैयारा’चा दिग्दर्शक मोहित सुरीचं देखील खूप कौतुक केलं आहे. तसेच बॉबी देओलने कलाकारांच्या भूमिकांचेही कौतुक केले. अहान आणि अनितला त्यांच्या भुमिकांमध्ये पाहणे त्याच्यासाठी नक्कीच एक वेगळा आणि आनंदी अनुभव असल्याचं त्याने म्हटले. बॉबी म्हणतो की मोहितने पटकथा उत्तम प्रकारे रंगवली आहे. बॉबीने चित्रपटाची कथा, संगीत आणि सर्व गोष्टींचे कौतुक केले.
‘सैयारा’च्या यशानंतर चाहते अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहेत. कारण दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, ही जोडी आणखी कोणत्या चित्रपटात दिसते आणि त्यांचे कोणते चित्रपट येतात आणि ते पडद्यावर कसे काम करतात याबद्दल नक्कीच सर्वांना उत्सुकता आहे.
