जान्हवी कपूर हिची मोठी पोलखोल, प्रत्येक वेळी बदलली पसंत, रोहित शर्मा, विराट आणि
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असून सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

जान्हवी कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, जान्हवी कपूरच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. जान्हवी ही तिच्या अभिनयामुळेच नाही तर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. विशेष म्हणजे यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे धमाल करताना दिसले.
जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांचे प्रमोशन जोरदार करताना कायमच दिसते. सध्या जान्हवी कपूर हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. जान्हवी कपूर हिची आवड सतत बदलताना दिसत आहे. जान्हवी कपूर ही तिच्या मिस्टर एंड मिसेज माही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली होती. मिस्टर एंड मिसेज माही चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.
आता जान्हवी कपूर हिचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिला विचारण्यात आले की, तुझा आवडता क्रिकेटर कोण आहे? यावर जान्हवी कपूर हिने महेंद्र सिंह धोनी याचे नाव घेतले. तिने म्हटले की, मी महेंद्र सिंह धोनीची खूप जास्त मोठी फॅन आहे. त्याचदिवशी जान्हवी कपूर हिने दुसरी एक मुलाखत दिली.
सेम प्रश्न जान्हवी कपूर हिला दुसऱ्याही मुलाखतीमध्ये विचारण्यात आला की, तुझा आवडता क्रिकेटर कोणी तर चक्क तिने रोहित शर्मा याचे नाव घेतल. तिसऱ्या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिने विराट कोहली याचे नाव घेतले. एकाच दिवशी दिलेल्या तीन मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर हिची निवड सतत बदलताना दिसली.
पहिल्यांदा तिने महेंद्र सिंह धोनीचे नाव घेतले. दुसऱ्यांदा रोहित शर्माचे नाव आणि तिसऱ्यांदा विराट कोहलीचे नाव घेतले. आता यावरून लोक जान्हवी कपूर हिची मजाक उडवताना दिसत आहेत. एकाने म्हटले की, शिखर पहाडिया याचे काहीच खरे नाही बाबा…कारण या जान्हवी कपूरची पसंत सतत बदलताना दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, जान्हवी कपूर एकाच मतावर ठाम राहिल्या शिक बरे होईल.
