AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला खासदारचं धक्कादायक वक्तव्य, सर्वत्र खळबळ म्हणाली, सर्वांना फक्त मुलगा…

Kangana Ranaut on Daughter-Son: महिला खासदारचं धक्कादायक वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आलं आहे. त्यांनी नुकताच धक्कादायक वक्तव्य केलं आहे... 'दुसरी मुलगी झाल्यानंतर सर्वांना फक्त...' असं खासदार म्हणाल्या

महिला खासदारचं धक्कादायक वक्तव्य, सर्वत्र खळबळ म्हणाली, सर्वांना फक्त मुलगा...
Kangana Ranaut
| Updated on: Nov 17, 2025 | 3:27 PM
Share

अनेक जण असं दाखवतात की मुलगी झाली तर, त्यांना काही फरक पडत नाही… पण असं काहीही नसतं… फरक सगळ्यांना पडतो… असं वक्तव्य अभिनेत्री आणि महिला खासदार कंगना राणौत यांनी केलं आहे. सांगायचं झालं तर, कंगना राणौत यांनी पहिल्यांदा असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. याआधी देखील कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. कंगना राणौत यांना स्वतः च्या विधानांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरी देखील कंगना प्रत्येक विषयावर स्वतःचं ठाम आणि स्पष्ट मत मांडत असतात.

दरम्यान, कंगना राणौत यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर कंगणा यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे… कंगना राणौत यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे बी-टाउनपासून सोशल मीडियापर्यंत खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत कंगना यांनी मुलाच्या इच्छेबद्दल उघडपणे सांगितलं.

कंगना म्हणाल्या, ‘आशियाई घरातील एकच सत्य आहे… पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर पुन्हा मुलगी झाली तर… असे अनेक शिक्षित कुटुंब आहे, जे आम्हाला काही फरक पडला नाही असं दाखवतात. पण असं काहीही नसतं. मुलगी झाली तर फरक सर्वांना पडतो.’

कंगना पुढे म्हणाल्या, ‘पहिल्या मुलीनंतर भेदभाव दिसून येत नाही, परंतु दुसरी मुलगी जन्माला आल्यावर तो अनेकदा स्पष्ट पणे दिसून येतो… ज्या लोकांना फरक पडतो अशा लोकांना मी ओळखते… कंगना यांचं हे वक्तव्य सध्या तुफान व्हायरल होत आहे… कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असतात..

कंगना राणौत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. ज्यामुळे कंगना यांची लोकप्रियता हळू – हळू कमी होऊ लागली…

कंगना राणौत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. ज्यामुळे कंगना यांची लोकप्रियता हळू – हळू कमी होऊ लागली.. बॉलिवूडमध्ये स्वतःचं मशिब  आजमावल्यानंतर  कंगना यांनी राजकारणाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदार संघातून त्या निवडून देखील आल्या. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

कंगना राणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर त्या  कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कंगणा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व अपडेट्स देत असतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...