Kangana Ranaut म्हणते, ‘इंडिया इज इंदिरा’, Emergency सिनेमाचा टीझर पाहून व्हाल थक्क
'इंडिया इज इंदिरा और इंदिरा इज इंडिया...', अभिनेत्री कंगना रनौत स्टारर Emergency सिनेमाचा टीझर प्रदर्शित... अभिनेत्रीची एक झलक पाहून व्हाल थक्क

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाचा आगामी ‘इमरजेन्सी’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘इमरजेन्सी’ सिनेमाच्या टीझरची चर्चा सुरु आहे. टीझरमध्ये कंगनाने साकारलेल्या भूमिकेची तुफान चर्चा रंगत आहे. ‘इमरजेन्सी’ सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पूर्ण सिनेमा एकटी कंगनाने दिग्दर्शित केला आहे. शिवाय सिनेमात मुख्य भूमिका देखील अभिनेत्रीने साकारली आहे.
‘इमरजेन्सी’ सिनेमा दिग्दर्शित करण्याआधी कंगनाने ‘मणिकर्णिका’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. अता ‘इमरजेन्सी’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कंगना रनौत हिच्यावर आहे. अभिनेत्रीने ‘इमरजेन्सी’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची देखील घोषित केली आहे. कंगना रनौत स्टारर ‘इमरजेन्सी’ सिनेमा २४ नोव्हेंबर २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना आवडत आहे. टीझरची सुरुवात अभिनेता अनुपम खेर यांच्या डायलॉग पासून सुरु होते आणि कंगनाच्या एक वक्तव्यावर टीझर संपतो.. टीझरमध्ये कंगनाची दमदार भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
टीझरमध्ये कंगना म्हणते, ‘मुझे इस देश की रक्षा करने से कोई नहीं रोक सकता. क्योंकि इंडिया इज इंदिरा और इंदिरा इज इंडिया….’ टीझर पाहून प्रेक्षक उत्सुक असतो.. शिवाय ‘तानाशाही बंद करो…’ असं नारे देत नागरिक आंदोलन करत आहेत… असं चित्र देखील सिनेमात दिसत आहे…
अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली कंगना सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना कायम प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधताना दिसते. पण आता कंगना ‘इमरजेन्सी’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आली आहे..
कंगना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. कंगनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण अभिनेत्रीचा विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी कंगना दमदार अभिनयामुळे देखील तुफान चर्चेत असते.
