‘कंडोमची अॅड,वल्गर सीन अन्… तिन्ही खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीवर अश्लीलतेचा आरोप, FIR दाखल
सलमान, शाहरूख आणि आमिर खान तिघांसोबतही का केलेल्या अभिनेत्रीवर एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. पैशांसाठी अश्लील चित्रपट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉलिवूडमधील कलकारांचे नाव कधी कोणत्या घटनेमध्ये येईल हे काही सांगता येत नाही. अलिकडे अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. या अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानसोबत काम केलं आहे. पण आता तिच्यावर अश्लील चित्रपट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा या अभिनेत्रीचं नाव समोर आलं तेव्हा नक्कीच सर्वांना धक्का बसला.
पैशाच्या लोभासाठी अश्लील चित्रपट
या अभिनेत्रीने फक्त बॉलिवूडच नाही तर तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिच्यावर पैशाच्या लोभासाठी अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याचा आरोप करण्यात आला होता. चला तर मग सलमान खान ते शाहरुख खान यांच्या चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?
ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम अभिनेत्री श्वेता मेनन आहे. जिने जवळपास 30 हिंदी चित्रपटांमध्ये कामह केले आहे. तिने अजय देवगण-आमिर खानच्या ‘इश्क’ चित्रपटातील ‘हमको तुमसे प्यार है’ या गाण्यात ती दिसली आहे. तसेच हे गाणे देखील सुपरहिट झाले. त्यानंतर ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली.
कोच्चीच्या एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल
आता श्वेता मेननबद्दल एक मोठी बातमी समोर आली. कोच्चीच्या एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला आहे. तिच्यावर आर्थिक फायद्यासाठी अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याचा आरोप होता. तथापि, या आरोपांबद्दल आणि प्रकरणाबद्दल अभिनेत्रीने कोणतेही अधीकृत विधान केलेले नाही.
कंडोम ब्रँडची जाहिरातीचा देखील समावेश
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67अ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्वेता मेननने काही चित्रपटातील दृश्यांमध्ये अश्लीलता दाखवली आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. जसं की ‘पलेरी मइक्यम फिल्म’ ते रत्निर्वेदन या चित्रपटातही. याशिवाय यात एका कंडोम ब्रँडची जाहिरात देखील समाविष्ट आहे. असे सांगितले जात आहे की ही दृश्ये सोशल मीडिया, ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच प्रौढ वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
View this post on Instagram
साऊथमध्येही काम केले
श्वेता मेननचा जन्म 23 एप्रिल 1974 रोजी झाला. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर ती एक अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट म्हणूनही काम करताना दिसली. श्वेता मेननने मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावले. एवढेच नाही तर तिने 1994 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताबही जिंकला आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली. तिने हिंदी तसेच साऊथमध्येही काम केले. केरळ राज्य पुरस्कारासोबतच तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
आमिर खान आणि अजय, शाहरूख अन् सलमानसोबतही केलंय काम
1997 मध्ये आलेल्या ‘इश्क’ चित्रपटाने श्वेता मेननने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिथे ती आमिर खान आणि अजय देवगणच्या चित्रपटात पांढऱ्या ड्रेसमध्ये आयटम नंबर करताना दिसली होती. ‘हमको तुमसे प्यार है’ हे गाणे देखील खूप लोकप्रिय झाले. सोबतच श्वेता देखील. श्वेता मेननने शाहरुख खानच्या अशोका आणि सलमान खानच्या बंधन या चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने सुमारे 30 बॉलिवूड चित्रपटांमध्ये मोठ्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे.
