AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : तापसी पन्नू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

तापसी पन्नू हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. तापसी पन्नू हिचा काही दिवसांमध्ये डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तापसी पन्नू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

Video : तापसी पन्नू नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल
| Updated on: Oct 08, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई : तापसी पन्नू ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने बाॅलिवूडमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. तापसी पन्नू हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे तापसी पन्नू ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. तापसी पन्नू ही शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या आगामी डंकी चित्रपटात मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसणार आहे. शाहरुख खान आतापासूनच त्याच्या डंकी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. अगोदर पठाण, जवान आणि आता काही दिवसांमध्ये शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे आता तापसी पन्नू आणि शाहरुख खान यांची जोडी काय धमाका करते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

सध्या सोशल मीडियावर तापसी पन्नू हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. तापसी पन्नू या व्हिडीओमध्ये संतापलेली दिसतंय. तापसी पन्नू ही पापाराझी यांच्यावर भडकलीये. तापसी पन्नू हिला पाहून पापाराझी यांनी तिच्या भोवती मोठी गर्दी केली. यावेळी तापसी पन्नू म्हणाली की, प्लीज इथून थोडे बाजूला व्हा.

नाही तर म्हणाल धक्का मारला. हे तापसी पन्नू परत परत अनेकदा म्हणताना दिसली. यानंतर तापसी पन्नू ही गाडीमध्ये बसते. आता तापसी पन्नू हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांना तापसी पन्नू हिचे हे बोलणे अजिबात आवडले नाहीये. तापसी पन्नू हिच्या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, आज मॅडम जास्त चिडलेल्या दिसत आहेत.

दुसऱ्याने लिहिले की, अरे हिला घरी जाऊद्या खूपच जास्त थकल्या आहेत. दुसरीकडे पापाराझी यांना अशाप्रकारे बोलल्यामुळे तापसी पन्नू हिला मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ट्रोल केले जातंय. हे पहिल्यांदाच नाही की, तापसी पन्नू ही पापाराझी यांच्यावर भडकली. यापूर्वीही बऱ्याच वेळा तापसी पन्नू ही पापाराझी यांच्यावर भडकलीये.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.