Dharmendra : धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत काय काय घडलं? गोविंदाच्या बायकोने सगळंच सांगितलं… सुनीता म्हणाली, हेमा मालिनी…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यासाठी आयोजित प्रार्थना सभेत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. हेमा मालिनी यांनी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत गोविंदा यांची पत्नी सुनिता आहुजा भावूक झाल्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना एक महान व्यक्तिमत्व म्हटले

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मुंबईतील निवासस्थानी कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबियांवर नव्हे तर बॉलिवूड आणि चाहत्यांनाही मोठा दक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने एका युगाच अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार, सेलिब्रिटी यांनी या प्रेअर मीटला हजेरी लावली होती. तर दुसरीकडे धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी , अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही त्यांच्या निवासस्थानी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रेअर मीट ठेवली. अभिनेता गोविंदा याची पत्नी, सुनिता अहुजा ही त्या सभेला हेमामालिनी यांच्या घरी पोहोचली होती.
तिथे नेमकं काय घडलं ते सुनिता अहुजा यांनी स्पष्टपणे सांगितलं. तेथे पोहोचल्यावर त्या हेमामालिनी यांच्यासमोर स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळलेच.
काय म्हणाल्या सुनिता अहुजा ?
हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केलं होतं. हेमाजी यांनी तिथे भगवद गीत आणि भजन ठेवलं होतं. आम्ही सर्व भजनं ऐकली. ते ऐकून मी भावूक झाले,हेमीजी यांच्यासमोर मी रडण्यापासून स्वत:ला रोखूच शकले नाही, असं त्यांनी नमूद केलं.
हेमा मालिनी यांची स्थिती कशी ?
हेमामालिनी कशी आहे, त्यांची स्थिती कशी आहे, असा सवाल सुनिता यांना विचारण्यात आला. “मी काय सांगू? हे खूप मोठे नुकसान आहे. ते (धर्मेंद्र) एक महान व्यक्ती होते. मी त्यांच्या कुटुंबाचा खूप आदर करते. धर्मेंद्रजी माझे बालपणीचे क्रश होते. मी सध्या खूप निराश आहे.” असं सुनिता म्हणाल्या.
धर्मेंद्र यांच्या आठवणींना दिल्या उजाळा
धर्मेंद्रसोबतच्या त्यांच्या आठवणींबद्दल सुनीता म्हणाल्या, ‘मी धरमजींसोबत सोनी टीव्हीवर छलकाए जाम मध्ये परफॉर्म केले होते. मी त्यांच्यासोबत स्टेज शेअर केला. मी ईशा देओलच्या खूप जवळ आहे, माझे संपूर्ण कुटुंब आहे. आम्ही सर्व धर्मेंद्रजींचे खूप मोठे चाहते आहोत. एवढंच नव्हे तर गोविंदाशी लग्नही याच कारणासाठी केले कारण तो(थोडाफार) धर्मेंद्र यांसारखा दिसतो. गोविंदा इतका देखणा नाहीये, पण धर्मेंद्र हे इंडस्ट्रीतील सर्वात देखणा माणूस आहेत.” अशी भावना व्यक्त केली. मी 2 महिन्यांपूर्वीच गणेश चतुर्थीच्या वेळी धर्मेंद्र यांची भेट घेतली, असंही त्यांनी सांगितलं.
