सुहाना-आर्यन खानपासून ते अहान-अनन्यापर्यंत, बॉलिवूडमधील भाऊ-बहिणीचं रक्षाबंधन पाहिलंत का?
बॉलिवूडमध्येही सेलेब्स भाऊ-बहिणींच्या जोड्यांनी रक्षाबंधन साजरा केला आहे. त्यांचे खास क्षण ते कायमच आपल्या चाहत्यांसोबत साजरा करत असतात.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि आदराचा सण आहे. बॉलिवूडमध्येही काही भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत, ज्या त्यांच्या नात्यानं सर्वांचे मन जिंकतात. मग ते त्यांचे सोशल मीडियावरील फोटो असोत किंवा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडिओ असोत. त्यांचे चाहते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. आजही या सेलेब्स भाऊ-बहिणीच्या जोडीने रक्षाबंधन साजरा करून हा त्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
सुहाना खान आणि आर्यन खान
शाहरुख खानची मुले सुहाना आणि आर्यनची जोडी सर्वांनाच आवडते. सुहाना अनेकदा तिचा भाऊ आर्यनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आर्यन त्याच्या धाकट्या बहिणीचीही खूप काळजी घेतो आणि सुहानाही तिच्या भावाला प्रत्येक गोष्टीत साथ देते. व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, सुहाना खानने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर आर्यन खान दिग्दर्शनाच्या माध्यमातून या चित्रपटात प्रवेश करणार आहे.
सारा अली खान आणि इब्राहिम अली खान
सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुले सारा आणि इब्राहिम यांच्यातील मैत्रिचं नात सर्वांनाच माहित आहे. अनेकदा ही भावा-बहिणीची जोडी विविध ठिकाणी फिरायला जातानाही दिसतात. सारा तिच्या भावाला प्रेमाने इब्राहिम ‘इगी पो’ म्हणते. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ बनवतात. ते एकमेकांचे खूप समर्थन करतात, कठीण काळात नेहमीच एकत्र उभे राहताना दिसतात.
अनन्या पांडे आणि अहान पांडे
अनन्या पांडे आणि तिचा चुलत भाऊ ‘सैयारा’ फेम अहान पांडे यांच्यातही खूप प्रेमळ नाते आहे. अनन्या अनेकदा अहानला तिचा सर्वात चांगला मित्र म्हणते. दोघेही एकमेकांना पाठिंबा देतात आणि एकत्र खूप मजा करतात. भावा-बहिणीच्या नात्यात मैत्री किती महत्त्वाची असते हे त्यांच्या मैत्रीतून दिसून येते.
हुमा कुरेशी आणि साकिब सलीम
हुमा आणि साकिबची जोडीही खूप खास आहे. दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. दोघेही एकमेकांच्या चित्रपटांचे खूप प्रमोशन करतात. साकिब त्याच्या मोठ्या बहिणीच्या चित्रपटांबद्दल खूप उत्साहित आहे आणि हुमा देखील नेहमीच तिच्या भावाला पाठिंबा देत असते.
सैफ अली खान आणि सोहा अली खान
सैफ अली खान आणि सोहा अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात स्टायलिश भावंडे मानले जातात. दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात आणि नेहमीच एकत्र उभे राहतात. सोहा अनेकदा सैफच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करते. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सोहाने सांगितले होते की तिचा भाऊ सैफला स्वयंपाकाची आवड आहे आणि तो नेहमीच तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतो.
