जाता जाताही सत्कार्य करून गेला अभिनेता पुनीत राजकुमार, नेत्रदानामुळे 4 लोकांना मिळाली दृष्टी!

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा अभिनेता आता आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. रिपोर्ट्सनुसार, विक्रम सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत होता आणि त्याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला.

जाता जाताही सत्कार्य करून गेला अभिनेता पुनीत राजकुमार, नेत्रदानामुळे 4 लोकांना मिळाली दृष्टी!
Puneeth Rajkumar
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 1:33 PM

मुंबई : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा अभिनेता आता आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेला यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. रिपोर्ट्सनुसार, विक्रम सकाळी जिममध्ये वर्कआऊट करत होता आणि त्याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टर पुनीतची प्रकृती गंभीर असून, आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे निवेदन डॉक्टर सतत देत होते.

मात्र, लाखो प्रयत्न करूनही पुनीतला वाचवता आले नाही. पण जाताना पुनीतने असे उदात्त कार्य केले की, ज्यासाठी तो सदैव स्मरणात राहील. खरे तर पुनीतच्या वडिलांप्रमाणे पुनीत याचे नेत्रसुध्दा अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी दान केले. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर 6 तासांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली.

आता समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने दान केलेल्या नेत्रांच्या मदतीने 4 जणांना दृष्टी मिळाली आहे. माध्यम वृत्तानुसार, अभिनेत्याच्या नेत्रदानामुळे 3 पुरुष आणि 1 स्त्रीला दृष्टी मिळविण्यात मदत झाली आहे.

4 रुग्णांना मिळाली दृष्टी!

वृत्तानुसार, डॉक्टर भुजंग शेट्टी म्हणाले की, सर्व 4 रुग्ण 20-30 वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्वजण सहा महिन्यांपासून प्रतीक्षा यादीत होते. कोरोनामुळे नेत्रदानाचे काम पूर्णपणे थांबले होते. पूर्वी आम्ही आमच्या रुग्णालयात दर महिन्याला 200 प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करायचो. आता गेल्या 2-3 महिन्यांत गोष्टी आधीप्रमाणे चांगल्या होत आहेत. परंतु, प्रतीक्षा यादी अजूनही खूप मोठी आहे, त्यामुळे आम्ही आमच्याकडे असलेल्या डोळ्यांचा सर्वोत्तम वापर करत आहोत, त्यामुळे आम्ही 2 ऐवजी 4 रुग्णांचे यशस्वी प्रत्यारोपण करू शकलो.

डॉक्टरांनी असेही सांगितले की, पुनीतचे वडील डॉ. राजकुमार यांनी शपथ घेतली होती की, ते आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करतील आणि कुटुंबाने त्यांचे वचन पूर्ण केले. एवढा कठीण प्रसंग असतानाही, त्यांनी मला फोन करून नेत्रदानाबद्दल विचारले. ते सर्व खूप खंबीर आहेत.

पुनीतच्या जाण्याने सर्वांनाच बसला धक्का!

पुनीतच्या जाण्यानंतर अनेक सुपरस्टार्सनी अभिनेत्याच्या अखेरच्या प्रवासाला हजेरी लावली होती. त्यांचे पार्थिव पाहून सर्वजण भावुक झाले. कुणालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

पुनीतचे चित्रपट

पुनीतच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवट ‘युवारथना’मध्ये दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचे 2 चित्रपट रिलीज होणार आहेत, ज्यात ‘जेम्स’ आणि ‘द्वित्वा’ चित्रपटाचा समावेश आहे.

हेही वाचा :

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज कुंद्राचा मोठा निर्णय, फेसबुक-इंस्टाग्रामसह सोशल मीडियाला अलविदा!

Mannat | शाहरुख खानच्या आलिशान ‘मन्नत’च्या नावामागे ही एक अनोखी कथा, तुम्हाला माहितीये का?

Zee Marathi Awards 2021 : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

Mithila Palkar : फंकी गुलाबी ड्रेस आणि किलर अदा, पाहा मिथिला पालकरचा खास अंदाज

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.