AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्या पांडेला ऑफर केलेल्या चित्रपटांसाठी निर्माते आता वेगळ्या चेहऱ्याच्या शोधात, वाचा नेमके काय सुरू?

लाइगर चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ट्रेलरपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत होती. मात्र, चित्रपट काही खास कमाल करू शकला नाहीये.

अनन्या पांडेला ऑफर केलेल्या चित्रपटांसाठी निर्माते आता वेगळ्या चेहऱ्याच्या शोधात, वाचा नेमके काय सुरू?
| Updated on: Sep 22, 2022 | 10:14 AM
Share

मुंबई : चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे. अनन्या आणि विजय देवरकोंडा यांचा बहुप्रतिक्षित लाइगर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आला. मात्र, जेवढी या चित्रपटाची चर्चा होती, त्या तुलनेत लाइगर चित्रपट काही खास कामगिरी करू शकला नाहीये. 17 शहरांमध्ये चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करूनही चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर (Box office) चांगले कलेक्शन करण्यात यश मिळाले नाहीये. लाइगरची कमाई दणक्यात होणे अपेक्षित होते. चित्रपटाच्या अपयशाचे खापर आता अनन्या पांडेवर फोडले जातंय. इतकेच नाही तर लाइगर चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्यालाही मोठा फटका बसताना दिसतोय.

लाइगर चित्रपटाच्या अपयशानंतर अनन्याला इतर चित्रपटांचा ऑफर येईना…

लाइगर चित्रपटाचे ट्रेलर आणि गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ट्रेलरपासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेमके काय घडले हे कळण्याच्या अगोदरच चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फेल गेला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी टॉलिवूडमध्ये अनन्या पांडेच्या नावाची प्रचंड चर्चा बघायला मिळत होती. इतकेच नाही तर यादरम्यान अनन्याला चित्रपटाच्या ऑफर्स देखील मिळत होत्या.

लाइगर चित्रपटाच्या अपयशाचे खापर शेवटी अनन्यावर

लाइगर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनन्या पांडे तिच्या फीसमध्ये मोठी वाढ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, बाॅक्स ऑफिसवर लाइगर काही खास कमाई करून न शकल्याने ज्या चित्रपटांच्या ऑफर्स अनन्याला आल्या होत्या, ते निर्माते आता वेगळ्या चेहऱ्याच्या शोधात आहेत. अनन्या पांडे चित्रपटात काही खास कामगिरी करू न शकल्याने लाइगर चित्रपट फ्लाॅप झाल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केला जातोय.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.