थिएटरमध्ये ‘बच्चन पांडे’चा शो सुरू असताना घातला राडा; The Kashmir Filesचा शो लावण्याची मागणी

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस उलटले तरी बॉक्स ऑफिसवर अद्याप या चित्रपटाची जादू कायम आहे. नुकतंच या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणाऱ्या मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर देत द काश्मीर फाईल्सने थिएटरमध्ये अजूनही वर्चस्व गाजवत आहे.

थिएटरमध्ये 'बच्चन पांडे'चा शो सुरू असताना घातला राडा; The Kashmir Filesचा शो लावण्याची मागणी
Bachchan Pandey and The Kashmir FilesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:07 AM

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित होऊन 12 दिवस उलटले तरी बॉक्स ऑफिसवर अद्याप या चित्रपटाची जादू कायम आहे. नुकतंच या चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला. बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणाऱ्या मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर देत द काश्मीर फाईल्सने थिएटरमध्ये अजूनही वर्चस्व गाजवत आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने या चित्रपटाचं आणि त्यातील अनुपम खेर यांच्या दमदार अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं. अक्षयचा ‘बच्चन पांडे’ (Bachchhan Paandey) हा चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. मात्र त्याच्या शोदरम्यान ओडिशामध्ये काही लोकांकडून थिएटरमध्ये राडा घालण्यात आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ‘बच्चन पांडे’चा शो सुरू असताना भगवा स्कार्फ घातलेल्या काही लोकांनी थिएटरमध्ये प्रवेश केला आणि धमक्या देत शो मध्येच थांबवला.

‘बच्चन पांडे’चा शो थांबवत जमावाने ‘द काश्मीर फाईल्स’च्या शोची मागणी केली. याआधीही अशा प्रकारची घटना घडल्याची तक्रार संबंधित थिएटर मालकाने केली. कधी 10 तर कधी 100 लोकांचा जमाव थिएटरच्या परिसरात दाखल होतो आणि गोंधळ घातला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे. अशाच एका जमावाने ‘द काश्मीर फाईल्स’चा शो सुरू असताना एक सीन काढून टाकल्याचा आरोप करत गोंधळ घातला होता. यावर बोलताना थिएटर मालक पुढे म्हणाला, “थिएटरचा मॅनेजर कोणत्याही चित्रपटातून एखादा सीन कसा काय काढू शकतो?”

द काश्मीर फाईल्सबद्दल अक्षय कुमारचं ट्विट-

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ने आतापर्यंत 34 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ‘द काश्मीर फाईल्स’ने भारतात गेल्या 11 दिवसांत 180 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाउननंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक करणारा हा चित्रपट ठरला आहे. ‘अनुपम खेरजी, द काश्मीर फाईल्स या चित्रपटातील तुमच्या दमदार अभिनयाबद्दल मी ऐकलंय. प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये येत आहेत. मीसुद्धा हा चित्रपट लवकरच पाहीन,’ अशा शब्दांत अक्षयने कौतुक केलं होतं.

हेही वाचा:

Sana Khanने चाखली 24 कॅरेट सोन्याच्या चहाची चव; किंमत वाचून व्हाल थक्क!

मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.