Happy Birthday Sanjay Kapoor | माधुरीसोबतच्या एका चित्रपटाने रातोरात संजय कपूरला बनवले स्टार! वाचा अभिनेत्याबद्दल…

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कपूर कुटुंबातील आणि अनिल कपूरचा भाऊ अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आज (17 ऑक्टोबर) आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1965 रोजी मुंबईत झाला.

Happy Birthday Sanjay Kapoor | माधुरीसोबतच्या एका चित्रपटाने रातोरात संजय कपूरला बनवले स्टार! वाचा अभिनेत्याबद्दल...
Sanjay Kapoor
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 7:21 AM

मुंबई :  चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कपूर कुटुंबातील आणि अनिल कपूरचा भाऊ अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आज (17 ऑक्टोबर) आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1965 रोजी मुंबईत झाला आणि वडिलांचे नाव सुरिंदर कपूर होते जे स्वतः चित्रपट निर्माता होते. सुरिंदर कपूर यांना बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर नावाचे तीन मुलगे होते आणि तिघांनीही करिअर म्हणून चित्रपटांची निवड केली. चला तर मग जाणून घेऊया संजय कपूर यांच्या वाढदिवशी संबंधित काही रंजक गोष्टी…

संजय कपूरचा चित्रपट प्रवास

संजय कपूरने 1995 मध्ये तब्बूसोबत ‘प्रेम’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, मात्र चित्रपटाचे रिलीज अनेक वर्षांसाठी लांबणीवर पडले आणि त्याचा बॉक्स ऑफिसवर वाईट परिणाम झाला. संजय कपूर ‘राजा’ चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सोबत दिसला होता.

माधुरीला मिळाले ‘राजा’ चे श्रेय

‘राजा’ चित्रपट हिट झाला आणि त्याच वेळी त्याने संजय कपूरला रातोरात स्टार बनवले. पण, अनेक लोकांनी याचे श्रेय मुख्यतः माधुरी दीक्षितला दिले. समीक्षक अगदी इतके सांगून गेले की, चित्रपटाचे नाव ‘राजा’ नसून ‘राणी’ असायला हवे होते. ‘राजा’ नंतर संजय कपूर मोठ्या पडद्यापासून गायब झाला आणि त्यांनी ‘औजार’, ‘मोहब्बत’ आणि ‘सिर्फ तुम’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आला.

मात्र, ‘राजा’ नंतरचे हे चित्रपट अभिनेत्याच्या कारकिर्दीला विशेष लाभ देण्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. वर्ष 2002 मध्ये त्याने ‘कोई मेरे दिल से पूछे’ चित्रपटात निगेटिव्ह पात्रही साकारले. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे लोकांनी कौतुकही केले, मात्र हा चित्रपट तेव्हाही फ्लॉप ठरला.

त्यानंतर संजय कपूर, अजय देवगण स्टारर ‘कयामत’ मध्ये एका दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसला आणि त्याला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभिनेता असण्याव्यतिरिक्त, संजयने निर्माता म्हणून 3 चित्रपटांमध्ये काम केले. यापैकी ‘तेवर’ चित्रपटात तो पुतण्या अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. चित्रपटांव्यतिरिक्त 2003 मध्ये त्याने करिश्मा कपूरसोबत टीव्ही सीरियल ‘करिश्मा – द मिरेकल ऑफ डेस्टिनी’ मध्येही काम केले. आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्या डावात बऱ्याच काळानंतर संजय कपूर अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ आणि वेब सीरीज ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात दिसला.

वैयक्तिक जीवन

1997 मध्ये संजय कपूरने अनिवासी भारतीय महिप कपूरशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत मुलगी शनाया कपूर आणि मुलगा जहां कपूर. मुलगी शनाया आतापासून सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे आणि इतर स्टारकिड्ससह पार्टी आणि इव्हेंटमध्ये देखील दिसते. असा अंदाज आहे की संजयची मुलगी शनायालाही चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यात रस आहे.

हेही वाचा :

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’चं शूटिंग पुन्हा सुरू, जॅकलिन फर्नांडिसने सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Samantha New Film : दसऱ्याच्या मुहूर्तावर समंथाने स्वीकारला मोठा प्रोजेक्ट, दोन भाषांमध्ये दाखवणार अभिनयाचा जलवा!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.