या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर भाळला दाऊद इब्राहिम; सतत तिचा पाठलाग करायचा अन् एका रात्रीत ती गायब झाली
अशी एक अभिनेत्री जी एका चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. दाऊद इब्राहिम देखील तिच्या सौंदर्यावर भाळला होता असं म्हटलं जातंं. त्याच्या त्रासाला कंटाळून बॉलिवूडपासून दूर झाली अन् अचानक गायब झाली. आजपर्यंत तिच्याबाबतची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे अभिनेते किंवा अभिनेत्री एका हिट चित्रपटानंतर रातोरात स्टार बनतात, परंतु नंतर अचानक प्रसिद्धीझोतातून गायब होतात. अशीच एक अभिनेत्री जिला एका चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती, परंतु अचानक ती नंतर गायब झाली.आजही तिच्याबद्दल काहीच माहिती नाहीयेत. चाहत्यांना देखील ती कुठे आहे ?, ती काय करते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
या हॉरर चित्रपटाने एका रात्रीत ओळख दिली
‘वीरणा’ हा चित्रपट आजही सर्वांना आठवत असेल. रामसे ब्रदर्स श्याम आणि तुलसी रामसे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा एक कमी बजेटचा हॉरर चित्रपट होता, ज्याचे एकूण बजेट फक्त 60 लाख रुपये होते. तरीही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 1.5 कोटी रुपये कमावले आणि तो प्रचंड हिट ठरला. या चित्रपटातील अभिनेत्री जास्मिन धुन्ना तर रातोरात स्टार झाली. तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची जादू सर्व प्रेक्षांवर झाली होती.
लोक तिला मिल्की ब्युटी म्हणू लागले
तिने एका रहस्यमय महिलेची भूमिका साकारली होती, जी अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. तिच्या सौंदर्याने आणि शैलीने तिला एक वेगळी ओळख दिली. तिला मिल्की ब्युटी म्हणू लागले. फार कमी लोकांना माहिती आहे की जास्मिनने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिने ‘हातिम ताई’ सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका देखील केल्या. तिच्या नावावर फक्त काही चित्रपट आहेत. तिने ‘सरकारी मेहमान’ आणि ‘तलाक’ सारख्या कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या, परंतु ‘वीरणा’ नंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली पण तिची कारकीर्द थांबली आणि ती चित्रपटाच्या जगातून अचानक गायब झाली.
दाऊद इब्राहिमशी नाव जोडले गेले
जास्मिनच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक धक्कादायक दावे समोर आले. तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले जाऊ लागले. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार दाऊद जास्मिनसाठी वेडा होता असे म्हटले जायचे. असे म्हटले जात होते की जास्मिन जिथे जायची तिथे तो तिथे पोहोचायचा. याशिवाय, त्याने त्याचे साथीदारही तिच्या मागावर ठेवले होते, जे नेहमीच अभिनेत्रीच्या मागे असायचे. तो तिला महागड्या भेटवस्तू पाठवायचा आणि सतत तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. दाऊदचा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जास्मिनसाठी तणाव आणि असुरक्षिततेचे कारण बनू लागलं. असे म्हटले जाते की तिला धमक्याही येऊ लागल्या, ज्यामुळे ती हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर राहू लागली.
जास्मिन आता कुठे आहे?
तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, जास्मिनने कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलं नाही आणि अचानक गायब झाली. चित्रपटसृष्टीतून तिच्या अचानक निघून जाण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. काहींनी असा दावा केला की ती देश सोडून गेली आहे, तर काहींचा असा विश्वास होता की ती अंडरवर्ल्डच्या भीतीमुळे ती निघून गेली. आजही तिच्या वास्तविक स्थितीबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तथापि, ‘वीरणा’ चित्रपटातील तिचा सह-कलाकार हेमंत बिर्जे यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की जास्मिन आता अमेरिकेत राहते आणि एक यशस्वी उद्योजिका बनली आहे.
- jasmin
आजही कायम असलेले एक रहस्य
खरंतर, जास्मिन धुन्नाचे खरे नाव जास्मिन भाटिया आहे आणि तिने राहुल तुगनैत नावाच्या एका एनआरआयशी लग्न केले आहे. या गोष्टी आजपर्यंत पुष्टी झालेल्या नाहीत, कारण जास्मिन कधीही मीडियासमोर आली नाही. तिचा कोणताही सार्वजनिक फोटो, मुलाखत किंवा विधान बाहेर आलेले नाही. जास्मिन धुन्नाची कहाणी एका कलाकाराची कहाणी आहे ज्याने अल्पावधीतच खूप प्रसिद्धी मिळवली. अंडरवर्ल्डच्या कथित हस्तक्षेपाचा तिच्या कारकिर्दीवर आणि वैयक्तिक आयुष्यावर झालेला परिणाम तिची करिअर संपण्यामागचं मोठं कारण म्हटलं जातं.
