Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी 3’मध्ये अर्शद-अक्षयची टक्कर; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या या चित्रपटात दोघंही एकत्र दिसणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिसर्‍या भागातही अभिनेते सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Jolly LLB 3: 'जॉली एलएलबी 3'मध्ये अर्शद-अक्षयची टक्कर; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल
Jolly LLB 3Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 9:29 AM

जॉली एलएलबी हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले. अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) हा जॉली एलएलबीच्या पहिल्या भागामध्ये दिसला होता. त्यानंतर अक्षय कुमारने (Akshay Kumar) सीक्वेल म्हणजेच जॉली एलएलबी 2 मध्ये भूमिका साकारली होती. या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही कलाकारांनी यात उत्तम काम केलं आणि त्यामुळेच दोन्ही चित्रपटांना थिएटरमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) देखील येणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे या तिसऱ्या भागात अर्शद आणि अक्षय या दोघांची टक्कर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्या या चित्रपटात दोघंही एकत्र दिसणार आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तिसर्‍या भागातही अभिनेते सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

जॉली एलएलबीमध्ये अर्शद वारसी हा हिट अँड रन केस लढताना दिसला होता, तर जॉली एलएलबी 2 मध्ये अक्षय कुमार एका बनावट चकमक प्रकरणाची वकिली करताना दिसला होता. आता असं बोललं जात आहे की हा तिसरा चित्रपट देखील इतर दोन चित्रपटांप्रमाणेच दमदार कथानक दाखवेल. जॉली एलएलबी 3 वरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काही नेटकरी म्हणत आहेत की हा चित्रपट जबरदस्त असेल तर काहीजण उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं म्हटलं. यावरून विविध मजेदार मीम्स बनवून शेअर केले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा मीम्स-

अर्शद आणि अक्षय हे दोन्ही दमदार कलाकार असल्याने मोठ्या पडद्यावर दोघांची टक्कर पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल. 2023 च्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अर्शद आणि अक्षयशिवाय यामध्ये आणखी कोणते कलाकार झळकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.