बच्चन परिवाराची ‘बॉस लेडी’ जया बच्चन करणार डिजिटल विश्वात पदार्पण, ‘या’ वेब सीरीजमध्ये झळकणार!

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यानंतर आता ‘बच्चन’ कुटुंबातील ‘बॉस लेडी’ म्हणजेच अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यादेखील डिजिटल पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत.

बच्चन परिवाराची ‘बॉस लेडी’ जया बच्चन करणार डिजिटल विश्वात पदार्पण, ‘या’ वेब सीरीजमध्ये झळकणार!
जया बच्चन

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यानंतर आता ‘बच्चन’ कुटुंबातील ‘बॉस लेडी’ म्हणजेच अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यादेखील डिजिटल पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत. अभिषेकचे अनेक चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो-सीताबो’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता आणि आता जर या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला, तर जया बच्चन ‘सदाबहार’ नावाच्या वेब सीरीजमधून डिजिटल डेब्यू करणार आहेत (Jaya Bachchan is ready to debut on OTT platform with web series Sadabahar).

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, जया बच्चन फेब्रुवारीपासून या वेब सीरीजचे चित्रीकरण करत होत्या, पण त्यानंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर याचे शूटिंग थांबवण्यात आले. आता परिस्थितीत काहीशी सुधारणा होत असताना शुटिंगचे कामही सुरू झाले आहे. या टीमने या आठवड्यात 2 सिक्वेन्ससाठी शूट केले आहे, एक सोनी मोनीमध्ये चित्रित झाला आहे आणि एक अपना बाजारात अंधेरी येथे चित्रित झाला आहे. युनिटच्या 50 मेंबर्ससह हा शो बायो बबलमध्ये शूट करण्यात आला होता. शूटच्या वेळी निर्मात्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली होती.

माहिती अद्याप गुलदस्त्यात

मात्र, ही सीरीज कोणत्या विषयावर आधारित आहे आणि यात जया बच्चन व्यतिरिक्त अन्य कोणते कलाकार आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. या सीरीजमध्ये जया बच्चन यांची व्यक्तिरेखा खूप महत्वाची असणार आहे.

अभिनेत्री जया बच्चन 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत. 2016मध्ये रिलीज झालेला अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांचा चित्रपट ‘की अँड का’मध्ये त्या शेवटच्या वेळी दिसल्या होत्या. यातही त्या पाहुण्या कलाकार म्हणून उपस्थित होत्या.

यापूर्वी त्या हिंदी / बंगाली चित्रपट ‘सनग्लास’मध्ये कोंकणा सेन शर्मा, टोटा रॉय चौधरी (बंगाली), आर माधवन (हिंदी), रायमा सेन आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह झळकल्या होत्या. 2016 पासून जया बच्चन पुन्हा कोणत्याही चित्रपटात किंवा टीव्ही कार्यक्रमात दिसल्या नाहीत. मात्र, त्या जाहिरातींमध्ये नेहमीच झळकतात. याशिवाय त्या राजकारणात व्यस्त असतात. अनेक वेळा त्या संसदेत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात.

(Jaya Bachchan is ready to debut on OTT platform with web series Sadabahar)

हेही वाचा :

सलमान खानच्या बहिणाला डेट केल्यानंतर त्याच्या वहिनीच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर!

‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI